इंजिनिअरिंगसाठी उद्या गुणवत्ता यादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:41 AM2018-06-23T00:41:11+5:302018-06-23T00:41:30+5:30
इंजिनिअरिंग व फार्मसी या पदवी शिक्षणक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची वाढीव मुदत गुरु वारी (दि. २१) संपली. आता विद्यार्थ्यांचे लक्ष गुणवत्ता यादीकडे लागले असून, रविवारी (दि. २४) पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
नाशिक : इंजिनिअरिंग व फार्मसी या पदवी शिक्षणक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची वाढीव मुदत गुरु वारी (दि. २१) संपली. आता विद्यार्थ्यांचे लक्ष गुणवत्ता यादीकडे लागले असून, रविवारी (दि. २४) पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्र मातील इंजिनिअरिंग व फार्मसी पदवी प्रवेशासाठी फेलिसिटेशन सेंटरच्या माध्यमातून आॅनलाइन अर्ज करण्यासाठी मंगळवारी (दि. १९) शेवटची मुदत देण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार प्रवेश अर्ज करण्यासाठी विहित मुदतीत वाढ करून देण्यात आली होती. त्यानुसार फार्मसीची मुदत बुधवारी (दि. २०) संपली, तर इंजिनिअरिंगसाठी दि. २१ जून ही अंतिम मुदत होती. यंदा सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी फ्रीज, स्लाइड व फ्लोट या केंद्रिभूत पद्धतीने प्रवेशप्रक्रिया होत असून, त्यासाठी महाविद्यालयांत सुविधा केंद्र सुरू आहेत. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पहिली यादी जाहीर होणार असून, कॅप राउंड १ ते ३ याप्रमाणे प्रवेशप्रक्रि या होणार आहे. या प्रवेशप्रक्रियेअंतर्गत इंजिनिअरिंग प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले असून, पहिली गुणवत्ता यादी रविवारी (दि. २४) जाहीर होणार आहे. त्यानंतर २५ ते २८ जून कॅप राउंड-१ नुसार जागावाटप होईल, तर ३० जून ते ४ जुलै यादरम्यान रिपोर्टिंग सेंटरद्वारे (एआरसी) प्रवेश घेता येईल. फार्मसीसाठी २४ जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. २४ ते २७ जून यादरम्यान कॅप राउंड-१ असेल, तर २९ जून ते २ जुलै रोजी रिपोर्टिंग सेंटरद्वारे प्रवेश घेता येणार आहे.