दुसऱ्या विशेष फेरीसाठी ५ जानेवारीला गुणवत्ता यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:12 AM2021-01-02T04:12:49+5:302021-01-02T04:12:49+5:30

नाशिक : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आत्तापर्यंत तीन नियमित आणि एक विशेष फेरी राबवण्यात आली आहे. तर उर्वरित जागांसाठी ...

Quality list for the second special round on 5th January | दुसऱ्या विशेष फेरीसाठी ५ जानेवारीला गुणवत्ता यादी

दुसऱ्या विशेष फेरीसाठी ५ जानेवारीला गुणवत्ता यादी

Next

नाशिक : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आत्तापर्यंत तीन नियमित आणि एक विशेष फेरी राबवण्यात आली आहे. तर उर्वरित जागांसाठी दुसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून त्यानुसार मंगळवारी (दि. ५) या दुसऱ्या विशेष फेरीसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे.

नाशिक महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी प्रसिद्ध केलेल्‍या विशेष फेरीची प्रवेश प्रक्रिया संपली आहे. या फेरीत ४ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहे. आतापर्यंत झालेल्‍या फेऱ्यापैकी सर्वाधिक प्रवेश या फेरीतून झाले. दरम्‍यान, अद्याप ८ हजार ६६२ जागा रिक्‍त असून, यासाठी दुसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. अकरावी प्रवेशाच्‍या यापूर्वी झालेल्‍या तीन फेऱ्यांनंतर रिक्‍त जागांसाठी विशेष फेरी राबविण्यात आली होती. या फेरीच्या माध्यमातून ४ हजार ९१० विद्यार्थ्यांच्‍या प्रवेशाची संधी देण्यात आली होती. त्यापैकी ४ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले. यात ३ हजार ७६१ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीनुसार तर ५५८ विद्यार्थ्यांनी कोट्यांतर्गत आपले प्रवेश निश्‍चित केले, तर दोन विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले.

इन्फो----

६ ते ८ जानेवारीदरम्यान प्रवेश

दुसऱ्या विशेष फेरीसाठी १ जानेवारीला महाविद्यालये रिक्‍त जागांचा तपशील जाहीर करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग एक भरणे आणि महाविद्यालय प्राधान्‍यक्रम निवडीकरिता भाग दोन भरण्यासाठी १ ते ४ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या दरम्‍यान, बायफोकलकरिता प्रवेश निश्चितीची प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यानंतर, मंगळवारी (दि. ५) गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्तितीसाठी ६ ते ८ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

Web Title: Quality list for the second special round on 5th January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.