बाधित दांपत्याच्या संपर्कातील क्वारंटईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 07:53 PM2020-07-09T19:53:50+5:302020-07-10T00:23:07+5:30
वणी : येथील कोरोनाबाधित पती पत्नीच्या संपर्कातील दहा जणांना गुरूवारी बोपेगाव येथे क्वारनटाईन करण्यात आले. वणीत ३८ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यांचेवर नाशिकच्या खाजगी रु ग्णालयात उपचार सुरु होते.
वणी : येथील कोरोनाबाधित पती पत्नीच्या संपर्कातील दहा जणांना गुरूवारी बोपेगाव येथे क्वारनटाईन करण्यात आले. वणीत ३८ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यांचेवर नाशिकच्या खाजगी रु ग्णालयात उपचार सुरु होते.
गुरूवारी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. दरम्यान या व्यक्तीच्या आई वडिलांचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्याचा अहवाल बुधवारी रात्री प्राप्त झाला होता. ते दोघे पॉझिटीव्ह आल्याने नाशिकच्या एका
रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या पती पत्नीच्या संपर्कातील असलेल्या दहा व्यक्तीना खबरदारीचा उपाय म्हणुन क्वारंटाईन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यांचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येणारा असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
--------------------------
दोघांना डिस्चार्ज
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सील केलेली ईमारत व प्रतीबंधीत क्षेत्र गटविकास अधिकारी चन्द्रकांत भावसार यांच्या सुचनेनुसार सदरचे निर्बंध हटविण्यात आले आहे. शहरातील मानसी बिल्डिंग लगत असणाऱ्या एका ईमारतीत वास्तव्यास असलेले पती पत्नी कोरोनाच्या विळख्यात सापडले होते . जिल्हा रूग्णालयात उपचाराअंती अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
दरम्यानच्या कालावधीत सदरची ईमारत सील करण्यात आली होती व सदरचे क्षेत्र प्रतीबंधीत करण्यात आले होते. या ठिकाणी बंदोबस्त कार्यान्वित करण्यात आला होता.