संचारबंदी मोडणाऱ्यांचे सक्तीने क्वॉरण्टाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 11:31 PM2020-04-20T23:31:01+5:302020-04-20T23:31:14+5:30
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तेथील व त्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचीदेखील तपासणी करण्यात येत आहे. निगेटिव्ह अहवाल येणाºया व्यक्तींना तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या क्वॉरण्टाइन केंद्रामध्ये १४ दिवसांसाठी दाखल करण्यात येत आहे.
सिन्नर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तेथील व त्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचीदेखील तपासणी करण्यात येत आहे. निगेटिव्ह अहवाल येणाºया व्यक्तींना तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या क्वॉरण्टाइन केंद्रामध्ये १४ दिवसांसाठी दाखल करण्यात येत आहे.
सोमवारी (दि.२०) सकाळपर्यंत वावीच्या क्वॉरण्टाइन केंद्रात ४८ जण दाखल होते. याशिवाय बाहेरगावाहून, कोरोनाबाधित जिल्ह्यातून आलेल्या व होम क्वॉरण्टाइनचा सल्ला धुडकावणाऱ्यांसह संचारबंदी तोडणाºयांनादेखील याच केंद्रात राहण्याची शिक्षा भोगावी लागणार आहे.
तालुक्यात वावी, मुसळगाव व आगासखिंंड येथे अशा प्रकारच्या क्वॉरण्टाइन केंद्रांची उभारणी करण्यात आली असून, तेथे एकावेळी प्रत्येकी १५० जण राहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत वावी येथील गोडगे पाटील स्कूलमध्ये केंद्र कार्यान्वित आहे. तालुक्यात तीन पोलीस ठाण्यांमध्ये संचारबंदी भंगाचे गुन्हे होणाºया, कोरोनाबाधित क्षेत्रातून अथवा परजिल्ह्यांतून गुपचूप येणाºया ३५ जणांनादेखील या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांमार्फत येणाºयांना पुढील १४ दिवस या ठिकाणी सक्तीने राहावे लागणार आहे.
पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्या नियंत्रणात सर्व क्वॉरण्टाइन केंद्र शासनाच्या पुढील निर्देशापर्यंत सुरू राहणार आहेत. येथे दाखल व्यक्तींची पाणी, दोन वेळचे जेवण, राहण्याची व झोपण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था असून, रुग्णाच्या संपर्कातील व संचारबंदी गुन्हे करणाºयांना एकमेकांपासून बाजूला ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी नियमित आरोग्य तपासणी केली जात असून, पोलिसांकडून नियमित गस्त घातली जात आहे. येथे दाखल असणाºयांशिवाय बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली आहे.