बायकांच्या भांडणात लांबला अंत्यविधी ; दोन बायकांच्या वादात अंत्यविधीसाठी मृत नवºयाला (कलेवर) कित्येक तास वाट बघण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:20 AM2017-12-04T00:20:15+5:302017-12-04T00:22:13+5:30
नांदगाव : ‘इस्टेट’ने काढली समजूतनांदगाव : दोन बायकांशी लग्न केलेल्या नवºयावर जिवंतपणी कटू प्रसंग ओढावला जात असल्याचे सर्वश्रुत आहे; परंतु मेल्यानंतर दोन बायकांच्या वादात अंत्यविधीसाठी मृत नवºयाला (कलेवर) कित्येक तास वाट बघण्याची वेळ आल्याचा किस्सा येथे घडला.
नांदगाव : ‘इस्टेट’ने काढली समजूतनांदगाव : दोन बायकांशी लग्न केलेल्या नवºयावर जिवंतपणी कटू प्रसंग ओढावला जात असल्याचे सर्वश्रुत आहे; परंतु मेल्यानंतर दोन बायकांच्या वादात अंत्यविधीसाठी मृत नवºयाला (कलेवर) कित्येक तास वाट बघण्याची वेळ आल्याचा किस्सा येथे घडला.
मालेगाव तालुक्यातील जेऊर येथील इसमाने नांदगाव व जळगाव बु. येथील दोन महिलांशी विवाह केला होता. दोघींनाही त्याच्यापासून अपत्य प्राप्तीसुद्धा झाली. जिवंतपणी दोन्हीकडचे संसार लौकिकार्थाने व्यवस्थित होते. नवºयाच्या मृत्यूनंतर झाकलेल्या गोष्टी उघड झाल्या. या दु:खद घटनेला एकदम वेगळे वळण लागले. दोघींनी अंत्यविधी माझ्याच गावी झाला पाहिजे असा आग्रह धरला. अर्थातच ज्याच्या त्याच्या नातेवाइकांनी त्यावर रीदेखील ओढली. कोणीच कोणाचे ऐकेना. शेवटी वाद विकोपाला गेला.
रस्त्यावर चालू गाडीतून पडून मृत्यू झाल्याने मृताचे शवविच्छेदन करण्यात आले होते. अंत्यविधी कोणत्या गावी करायचा या विवादामुळे बाहेर गर्दी झाली. अनेक तास वादविवाद सुरू होते. दोघींनीही समजूतदारपणाने प्रश्न सोडविण्याचे आवाहन पोलिसांनी केले. पोलीस दोन्हीकडच्या नातेवाइकांना हा प्रश्न सामंजस्याने सोडवा असा सल्ला देऊन थकले; पण दोन्ही बाजूंकडे ऐकण्याची मन:स्थिती नव्हती. याचवेळी काही कागदपत्रे आणण्यात आली. कोर्टाचा निवाडा कोणाच्या बाजूने यावर हमरीतुमरी झाली. पण मार्ग काही निघेना. शासकीय पद्धतीने अंत्यसंस्कार करावे इथपर्यंत विचार झाला. पण त्यालाही विरोध करण्यात आला.
अखेर अंत्यविधी कुठेही करा, पण मालमत्ता व संपत्तीचा हिस्सा त्यावरून ठरणार नाही, असा मोलाचा सल्ला वकिलांकडून मिळाला आणि अंत्यविधीचे ग्रहण सुटले. पण आता दोन्हीकडे नको. मयताच्या गावी जेऊर येथेच अंत्यसंस्कार करावेत असे ठरले आणि त्याची अंमलबजावणीही झाली.