महिन्याभरात लागणार सीसीटीव्हीचा प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 01:07 AM2017-07-20T01:07:08+5:302017-07-20T01:07:19+5:30

गिरीश महाजन : लोकार्पण सोहळा; सुसज्ज व सुविधांयुक्त इमारत

The question of CCTV in the month will be completed | महिन्याभरात लागणार सीसीटीव्हीचा प्रश्न मार्गी

महिन्याभरात लागणार सीसीटीव्हीचा प्रश्न मार्गी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यापासून सुरू असलेली तसेच वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी आवश्यक असलेल्या सीसीटीव्हीचा प्रश्न येत्या महिनाभरात मार्गी लावण्यात येणार असून, येत्या अधिवेशनात निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले़ आवश्यक सोयी-सुविधांनी युक्त अशी दोन कोटी पाच लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आलेली आडगाव पोलीस ठाण्याची सुसज्ज इमारत ही राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे रोल मॉडेल असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी (दि़ १९) केले़
आडगाव पोलीस ठाण्याच्या स्वमालकीच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते़ महाजन पुढे म्हणाले की, पोलीस आयुक्तालयाचा चेहरा बदलणारपोलीस आयुक्तालय अर्थात हेडक्वॉर्टरचा चेहरा-मोहरा लवकरच बदलला जाणार असून, त्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे़ या आराखड्यामध्ये २२ मजली इमारती, स्पोर्ट्स क्लब, शूटिंग रेंज अशा अद्ययावत सुविधा असणार आहेत़ मुंबई नाका, उपनगर पोलीस ठाण्यासाठी जागा मिळावी तसेच म्हसरूळ पोलीस ठाण्यासाठी पाच एकर जागेची मागणी पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी यावेळी केली़

Web Title: The question of CCTV in the month will be completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.