स्वागत हाइट प्रकरणी विधिमंडळात प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:59 AM2018-11-27T00:59:46+5:302018-11-27T01:00:15+5:30

सातपूर विभागातील कामगारनगर येथे असलेल्या स्वागत हाइट प्रकरणात उंची जादा झाल्याने महापालिकेने दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा खंडित केल्याने दाखल प्रकरणात आता विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला

 Question High Court in the High Court | स्वागत हाइट प्रकरणी विधिमंडळात प्रश्न

स्वागत हाइट प्रकरणी विधिमंडळात प्रश्न

Next

नाशिक : सातपूर विभागातील कामगारनगर येथे असलेल्या स्वागत हाइट प्रकरणात उंची जादा झाल्याने महापालिकेने दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा खंडित केल्याने दाखल प्रकरणात आता विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला असून, त्यामुळे नगररचना विभागाची धावपळ सुरू झाली आहे. महापालिकेने स्वागत हाइट या इमारतीला पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर या इमारतीचे बांधकाम पंधरा मीटरपेक्षा अधिक उंचीचे आढळले. सोसायटीतील रहिवाशांचे दोन गट, तसेच बिल्डर यांच्या वादातून हा प्रकार आढळला. यामुळे अग्निशमन उपाययोजना नियमानुसार न केल्याने महापालिकेने या सोसायटीचा पाणीपुरवठा दोन महिन्यांपासून बंद केला आहे. गेल्या महासभेत याबाबत संतोष गायकवाड, विलास शिंदे आणि सलीम शेख यांनी हा विषय उचलून धरला. सोसायटीला पाणीपुरवठा सुरू करा, अशी मागणी केली होती. मात्र, तत्कालीन आयुक्त मुंढे यांनी नकार दिला होता.
आवाज उठविला
आता एका आमदाराने विधान परिषदेत यासंदर्भात आवाज उठविला असून, त्यासंदर्भात विधिमंडळाने महापालिकेकडून माहिती मागविल्याने नगररचना कार्यालयात अधिकाऱ्यांची धावपळ सुरू होती. सदरच्या इमारतीला पाणीपुरवठा द्या अन्यथा पूर्णत्वाचा दाखला देणाºया इमारतीवर कारवाई करा, अशी मागणी नगरसेवकांनी केली होती. त्यानंतर आयुक्त मुंढे यांनी पाणी देण्यापेक्षा अधिकाºयांवर कारवाई करण्याची तयारी दर्शविली आहे.

 

Web Title:  Question High Court in the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.