कोटमगावी आराेग्य उपकेंद्राचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:13 AM2021-05-01T04:13:37+5:302021-05-01T04:13:37+5:30
कोटमगाव परिसरातील सामनगाव, चाडेगाव, एकलहरे, सिद्धार्थनगर, गंगावाडी, कालवी, हिंगणवेढे या ठिकाणची लोकसंख्या मोठी आहे. त्यामानाने आरोग्य व्यवस्था अपुरी पडते. ...
कोटमगाव परिसरातील सामनगाव, चाडेगाव, एकलहरे, सिद्धार्थनगर, गंगावाडी, कालवी, हिंगणवेढे या ठिकाणची लोकसंख्या मोठी आहे. त्यामानाने आरोग्य व्यवस्था अपुरी पडते. काही ठिकाणी झोपडपट्टीचा भाग असल्याने अस्वच्छतेमुळे येथे कायम साथीच्या आजाराने रहिवाशांना ग्रासलेले असते. त्यामुळे या भागातील नागरिकांना उपचारासाठी आठ ते दहा किलोमीटर अंतरावरील शिंदे किंवा सैय्यदपिंप्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते. या भागात मोलमजुरी करणारे कष्टकरी, शेतमजूर व त्यांच्या कुटुंबीयांचा वेळ व पैसा खर्च होतो. त्यामुळे कोटमगाव परिसरातील सामनगाव, चाडेगाव, हिंगणवेढा, कालवी, एकलहरेगाव, सिध्दार्थनगर, गंगावाडी येथील लोकसंख्या व सोईचा विचार करत मध्यवर्ती ठिकाण म्हणून कोटमगाव येथे आरोग्य उपकेंद्र सुरू होणे अत्यंत गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कोट===
कोटमगाव हे मध्यवर्ती ठिकाण असून, वाहतुकीसाठी सोईस्कर आहे. शेजारी जाखोरी येथे उपकेंद्र आहे, परंतु मध्ये दारणा नदी असल्याकारणाने पेशंटला पावसाळ्यात जाण्या-येण्यासाठी गैरसोयीचे ठरते. त्यामुळे पेशंटची हेळसांड होते. म्हणून कोटमगाव येथे आरोग्य उपकेंद्र व्हावे.
-बाळासाहेब म्हस्के, सरपंच, कोटमगाव