लासलगावी शवविच्छेदन गृहाचा प्रश्न अखेर मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 11:25 PM2020-02-19T23:25:29+5:302020-02-20T00:11:30+5:30

लासलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन गृहाच्या बांधकाम आराखड्यास शासनाची मंजुरी मिळाली असून, ८५ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात ...

The question of Lasalgavi mutilation house is finally on its way | लासलगावी शवविच्छेदन गृहाचा प्रश्न अखेर मार्गी

लासलगावी शवविच्छेदन गृहाचा प्रश्न अखेर मार्गी

Next
ठळक मुद्देशासनाची मंजुरी : ८५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद

लासलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन गृहाच्या बांधकाम आराखड्यास शासनाची मंजुरी मिळाली असून, ८५ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या शवविच्छेदन गृह इमारतीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
लासलगाव येथे विविध सोयी सुविधांयुक्त ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले आहे. या ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र शवविच्छेदन गृहाची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. छगन भुजबळ यांनी याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भुजबळ यांनी हा विषय प्राधान्याने मार्गी लावला आहे. लासलगाव ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहाच्या बांधकामास शासनाने मंजुरी दिली असून, त्यासाठी ८५ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
लासलगाव परिसरातील मृत व्यक्तींचे शवविच्छेदन करण्यासाठी निफाड ग्रामीण रुग्णालय किंवा नाशिक जिल्हा रुग्णालयात जावे लागत होते. त्यामुळे लासलगाव ग्रामीण रुग्णालयातच ही सुविधा उपलब्ध व्हावी अशी मागणी अनेक दिवसांपासून होती. याबाबतचा आराखडादेखील शासनाला सादर करण्यात आला होता. दरम्यान, छगन भुजबळ यांनी सूचना करून हा आराखडा मंजूर करून घेतला आहे. लवकरच या इमारतीच्या बांधकामास सुरु वात होणार आहे.

Web Title: The question of Lasalgavi mutilation house is finally on its way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.