हवा-पाणी शुद्धतेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:07 AM2017-07-22T00:07:12+5:302017-07-22T00:07:25+5:30

नाशिक : महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन परिसरातच हवेचा गुणवत्ता निर्देशांक सर्वसाधारण तर गतवर्षाच्या तुलनेत पाणी शुद्धतेच्या टक्केवारीत घट झाल्याचे निष्कर्ष नोंदविले आहेत.

Question mark on air purity | हवा-पाणी शुद्धतेवर प्रश्नचिन्ह

हवा-पाणी शुद्धतेवर प्रश्नचिन्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन परिसरातच हवेचा गुणवत्ता निर्देशांक सर्वसाधारण तर गतवर्षाच्या तुलनेत पाणी शुद्धतेच्या टक्केवारीत घट झाल्याचे निष्कर्ष मनपाच्याच आरोग्य व पर्यावरण विभागाने नोंदविले आहेत. याशिवाय, शहरातील ध्वनिप्रदूषणाच्या पातळीतही कमालीची वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले आहे.
महापालिकेच्या आरोग्य व पर्यावरण विभागाने वार्षिक पर्यावरण मापन अहवाल महासभेला सादर केला. त्यात, हवा, पाणी आणि ध्वनिप्रदूषणाच्या पातळीविषयी निष्कर्ष नोंदवितानाच काही उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत. हवा गुणवत्ता निर्देशांकाबाबत अहवालात चार पैकी दोन ठिकाणी चांगला तर दोन ठिकाणी सर्वसाधारण दर्जा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे महापालिका मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन परिसरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४५.० असा सर्वसाधारण नोंदविण्यात आला आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीतील व्हीआयपी कंपनी परिसरातही हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४०.५० असा सर्वसाधारणच आहे. मात्र, उद्योग भवन, गोल्फ क्लबजवळील आरटीओ कॉलनी याठिकाणी निर्देशांक चांगला असल्याचे म्हटले आहे. हवेबरोबरच पाण्याच्या शुद्धतेविषयीही प्रश्नचिन्ह आहे.  सन २०१५ मध्ये १७ हजार ८८२ पाण्याचे नमुने तपासण्यात आले असता त्यातील १७ हजार ५१३ नमुने पिण्यायोग्य आढळून आले. टक्केवारीचे प्रमाण ९७.९४ होते. सन २०१६ मध्ये १० हजार १५८ नमुने तपासण्यात येऊन त्यातील ९९८७ नमुने पिण्यायोग्य आढळून आले. टक्केवारीचे प्रमाण ९७.३१ राहिले. मात्र, सन २०१६ मध्ये तपासणीसाठी पाणी नमुने घेण्याचे प्रमाण का घटले याबाबत प्रश्न उपस्थित होऊ शकतो. शहरातील ध्वनिप्रदूषणाच्या पातळीतही वाढ झाल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. निवासी क्षेत्रात ध्वनी मर्यादा ५५ डेसिबलच्या आत असणे बंधनकारक आहे. मात्र, शहरात दिवसा ८७ डेसिबलपर्यंत तर रात्री ७० डेसिबलपर्यंत ध्वनी पातळीचे प्रमाण गेल्याचे अहवालात म्हटले आहे. बाजारपेठ परिसरातही ध्वनी पातळीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
सुचविण्यात आलेले उपाय
अहवालात काही उपायही सुचविण्यात आले आहेत. त्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर समन्वय साधून शहरातील कारखाने व परिसरात हवा प्रदूषण नियंत्रण यंत्र बसवावे. ऋतुमानानुसार हवामानावर देखरेख ठेवणे व त्याच्या नोंदी घेणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्ययावत करणे, वृक्षारोपणावर भर देणे, सिग्नल्सवर प्रदूषण कमी करणारी यंत्रणा बसविणे, प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीपात्रात मिसळू न देणे, कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर जागेवरच प्रक्रिया करणे, जलशुद्धीकरण प्रक्रियेत सुधारणा करणे, नदीपात्रातील निर्माल्य व घाण-कचरा टाकण्यास प्रतिबंध करणे, ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रभावी योजना राबविणे आदी सूचनांचा समावेश आहे.

Web Title: Question mark on air purity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.