बाजार समित्या रद्द करण्याच्या भविष्यातील निर्णयाने प्रश्न चिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 06:54 PM2019-11-14T18:54:05+5:302019-11-14T18:55:15+5:30

लासलगाव : बाजार समित्यांची कार्यपद्धती आणि कामकाज तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाकरिता वाजवी दर देण्यात असमर्थ ठरत असल्याचे कारण देत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या बाजार समित्या बरखास्त करण्याबाबत केंद्र शासन सर्व राज्य सरकारांसमवेत बोलत असल्याचे सांगितल्याने जिल्ह्यातील सर्वच बाजार समिती तसेच व्यापारी, आडते व बाजार समितीच्या निगिडत असलेल्या घटकांपुढे प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

Question marks the future decision to abolish market committees | बाजार समित्या रद्द करण्याच्या भविष्यातील निर्णयाने प्रश्न चिन्ह

बाजार समित्या रद्द करण्याच्या भविष्यातील निर्णयाने प्रश्न चिन्ह

googlenewsNext
ठळक मुद्देसभापती : लासलगाव बाजार समितीने काळजी करण्याचे कारण नाही

लासलगाव : बाजार समित्यांची कार्यपद्धती आणि कामकाज तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाकरिता वाजवी दर देण्यात असमर्थ ठरत असल्याचे कारण देत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या बाजार समित्या बरखास्त करण्याबाबत केंद्र शासन सर्व राज्य सरकारांसमवेत बोलत असल्याचे सांगितल्याने जिल्ह्यातील सर्वच बाजार समिती तसेच व्यापारी, आडते व बाजार समितीच्या निगिडत असलेल्या घटकांपुढे प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये शेतकरी हाच बाजार समितीचा मालक म्हणून काम करत आहे. तसेच बाजार समितीमध्ये विक्र ी केलेल्या शेती मालाची रक्कम हि रोख स्वरूपात दिली जाते. शेतकरी वर्ग हा बाजार समितीच्या कामकाजावर समाधानी असुन या आधी शासनाने शेतकरी वर्गाला कुठेही शेती माल विक्र ी करायची परवानगी दिली आहे. तरीही शेतकरी वर्ग बाजार समिती मध्येच शेती माल विक्र ीस आणतो याचे कारण म्हणजे विक्र ी केलेल्या शेती मालाची पैशाची हमी व विश्वासमुळे आज बाजार समिती व व्यवहार टिकून आहे. तसेच केंद्र सरकारने आॅनलाईन राष्ट्रीय कृषी बाजार (ई नाम) अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काळानुसार निर्णय घेणे योग्यच असल्याचे लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी सांगितले.
पारदर्शकता, शेतकरी सुविधा, योग्य व चांगला भाव, रोख पैमेट, कुठलीच तक्र ारी नसलेल्या लासलगाव बाजार समितीने या निर्णयाची कुठलीच काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्य सरकारला या बाजार समितीच्या कामकाजाबाबतीत सर्व माहिती असुन लासलगाव सारख्या बाजार समितीची माहिती केंद्र व राज्य सरकार यांना आधीच असल्याचे जगताप यांनी सांगितले.

Web Title: Question marks the future decision to abolish market committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.