गोव्याच्या अधिवेशनात शिक्षक बदल्यांचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 12:25 AM2019-02-05T00:25:15+5:302019-02-05T00:32:53+5:30

नाशिक : गोवा येथे होणाऱ्या प्राथमिक शिक्षक महासंघाच्या अधिवेशनात नाशिकच्या जिल्हा परिषद शिक्षक बदल्यांमधील गोंधळाकडे मुख्यमंत्र्यांसह शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले जाण्याची दाट शक्यता आहे. आॅनलाइन बदल्यांमध्ये शासनाची दिशाभूल करून अपेक्षित बदली पदरात पाडून घेणाºया शिक्षकांना अभय देतानाच इतर शिक्षकांवर झालेला अन्याय अधिवेशनात मांडला जाणार आहे. नाशिक जिल्ह्णासह राज्यातील इतर ठिकाणीदेखील आॅनलाइन बदल्यांमध्ये झालेल्या गोंधळाबाबत शिक्षणमंत्र्यांना निवेदन देण्याची तयारी नाशिकच्या पदाधिकाºयांनी चालविली आहे.

The question of teacher transfers in the Goa session | गोव्याच्या अधिवेशनात शिक्षक बदल्यांचा प्रश्न

गोव्याच्या अधिवेशनात शिक्षक बदल्यांचा प्रश्न

Next
ठळक मुद्देशासनाचे वेधणार लक्ष : जिल्हा परिषदेतील गोंधळ येणार चव्हाट्यावर

नाशिक : गोवा येथे होणाऱ्या प्राथमिक शिक्षक महासंघाच्या अधिवेशनात नाशिकच्या जिल्हा परिषद शिक्षक बदल्यांमधील गोंधळाकडे मुख्यमंत्र्यांसह शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले जाण्याची दाट शक्यता आहे. आॅनलाइन बदल्यांमध्ये शासनाची दिशाभूल करून अपेक्षित बदली पदरात पाडून घेणाºया शिक्षकांना अभय देतानाच इतर शिक्षकांवर झालेला अन्याय अधिवेशनात मांडला जाणार आहे. नाशिक जिल्ह्णासह राज्यातील इतर ठिकाणीदेखील आॅनलाइन बदल्यांमध्ये झालेल्या गोंधळाबाबत शिक्षणमंत्र्यांना निवेदन देण्याची तयारी नाशिकच्या पदाधिकाºयांनी चालविली आहे.
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे अधिवेशन व शिक्षण परिषद येत्या ८ व ९ फेब्रुवारी रोजी गोवा येथे होणार आहे. या अधिवेशनासाठी मानव संसाधन विकासमंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह अनेक मंत्रिगण या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनात शिक्षकांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. या प्रलंबित मागण्यांबाबत कदाचित मुख्यमंत्र्यांकडून घोषणादेखील होण्याची शक्यता आहे. परंतु शिक्षक बदल्यांमधील गोंधळाला वाचा फुटावी यासाठी अधिवेशनात शिक्षक बदलीमध्ये झालेल्या प्रकाराबाबत गाºहाणे मांडले जाणार आहे. नाशिक जिल्ह्णातील अन्यायग्रस्त शिक्षकांच्या कृती समितीने यापूर्वीच न्यायालयात धाव घेतली आहे. आता अधिवेशनाच्या निमित्ताने शिक्षक बदल्यांकडे शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे. बदलीप्रक्रियेत खोटी माहिती भरून काही शिक्षकांनी शासनाची फसवणूक करून सोयीच्या बदल्या करून घेतल्या आहेत. प्रशासनाने देखील अशा शिक्षकांच्या बाजूने भूमिका घेतली आहे. त्यामुळे इतर शिक्षकांवर अन्याय झाला आहे. अनेक ठिकाणी पती-पत्नी एकत्रिकरण नव्हे तर त्यांना विभक्त करण्यात आले आहे. आदिवासी दुर्गम भागात सेवा करूनही त्यांनाच अवघड क्षेत्रात पाठवले आहे. आयुष्यभर ज्यांनी आदिवासी भागात सेवा केलेली नाही ते आजही सोयीच्या ठिकाणी काम करीत आहेत. महिला शिक्षकांच्या बदल्या करतानादेखील अनेक नियम पायदळी तुडविण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरमहा वेतन पाच तारखेच्या आत मिळावे, चटोपाध्याय, वरिष्ठ वेतनश्रेणी त्वरित लागू केल्यास कामगारांना त्याचा अधिकच लाभ होणार आहे. मार्च महिन्यापासून सकाळच्या शाळा कराव्यात, आदिवासी भागातील शिक्षकांना एकस्तर वेतनवाढ, शालेय पोषण आहाराची बिले वेळेवर मिळावित, एक वेतनवाढ फरक मिळावा, फरक बिले मिळावित, मेडिकल बिले मिळावित, मार्चपासून दुपारच्या शाळा सकाळी कराव्यात, अशी मागण्या करण्यात आल्या आहेत.

Web Title: The question of teacher transfers in the Goa session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक