उमा पार्क रस्त्याचा प्रश्न लवकर मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 11:54 PM2020-02-02T23:54:49+5:302020-02-03T00:19:55+5:30

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रभाग क्रमांक २८ मधील उमा पार्क परिसरातील रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सदरची जागा भूसंपादनासाठी जागा मालकांशी चर्चा करून संमती घेण्यात येणार आहे. यासाठी येत्या बजेटमध्ये सुमारे आठ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली असल्याची माहिती नगरसेवकांनी दिली.

The question of the Uma Park road will start soon | उमा पार्क रस्त्याचा प्रश्न लवकर मार्गी लागणार

उमा पार्कची पाहणी करताना महापौर सतीश कुलकर्णी. समवेत नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, दीपक दातीर, सुवर्णा मटाले, प्रतिभा पवार, अविनाश पाटील व परिसरातील नागरिक.

Next
ठळक मुद्देमहापौरांनी केली पाहणी : बजेटमध्ये आठ कोटींची तरतूद

सिडको : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रभाग क्रमांक २८ मधील उमा पार्क परिसरातील रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सदरची जागा भूसंपादनासाठी जागा मालकांशी चर्चा करून संमती घेण्यात येणार आहे. यासाठी येत्या बजेटमध्ये सुमारे आठ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली असल्याची माहिती नगरसेवकांनी दिली.
दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्याने ये-जा करणे कठीण होत असून, लहान मुलांनादेखील या रस्त्याने चालताना कसरत करावी लागते. याठिकाणी मनपाने रस्ता तयार करावा यासाठी येथील रहिवाशांनी प्रभागाचे नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, दीपक दातीर, सुवर्णा मटाले, प्रतिभा पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. शनिवारी (दि.१) प्रभागात महापौर दौरा असल्याने येथील रहिवाशांनी रस्त्याबाबत तक्रारी केल्या. यानंतर महापौरांनी या ठिकाणी पाहणी करून रस्ता तयार करण्यासाठी संबंधित जागा मालकाशी चर्चा करून लवकरच रस्ता भूसंपादन करण्यात येणार असल्याचे आश्वासन नागरिकांना दिले. या रस्त्यासाठी येत्या बजेटमध्ये आठ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांनी दिली.
यावेळी उमा पार्क येथील रहवासी सरला शेवाळे, निर्मला कानडे, अलका देवरे, पुष्पलता मंडलिक, मनीषा गोसावी, राजेंद्र कानडे यांच्यासह परिसरातील रहिवासी उपस्थित होते. सिडको प्रभाग क्रमांक २८ मधील शुभम पार्कलगतच्या मुख्य रस्त्याजवळच उमा पार्क असून याठिकाणी पाचशेहून अधिक नागरिक गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून राहतात. येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी एकच रस्ता असून, तोदेखील मनपाने अद्याप भूसंपादन न केल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.

Web Title: The question of the Uma Park road will start soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.