टोकन पद्धतीमुळे रांगाच रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 11:37 PM2020-04-07T23:37:33+5:302020-04-07T23:38:29+5:30
उमराणे येथील बाजार समितीत टोकन पद्धतीने लिलाव प्रक्रिया सुरू केल्याने टोकन मिळविण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने कांदा विक्रेते जास्त व टोकन कमी अशी अवस्था निर्माण झाली होती. बहुतांशी शेतकºयांना टोकन मिळाले नसल्याने त्यांच्यात व बाजार समिती प्रशासनात शाब्दिक चकमकही बघावयास मिळाली. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर टोकन वाटपात काही प्रमाणात सुधारणा झाली.
उमराणे : येथील बाजार समितीत टोकन पद्धतीने लिलाव प्रक्रिया सुरू केल्याने टोकन मिळविण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने कांदा विक्रेते जास्त व टोकन कमी अशी अवस्था निर्माण झाली होती. बहुतांशी शेतकºयांना टोकन मिळाले नसल्याने त्यांच्यात व बाजार समिती प्रशासनात शाब्दिक चकमकही बघावयास मिळाली. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर टोकन वाटपात काही प्रमाणात सुधारणा झाली.
कोरोनामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून बाजार समितीत कांदा खरेदी विक्र ीचे व्यवहार बंद असल्याने बहुतांशी शेतकºयांच्या शेतातच लाल व उन्हाळ कांदा पडून होता. त्यामुळे शेतकºयांना बाजार समित्या सुरू होण्याची प्रतीक्षा लागून होती. मंगळवारी (दि.७) शासनाच्या आदेशान्वये बाजार समित्या सुरू करण्यात आल्या.
कोरोना व्हायरसचा फैलाव बघता गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी बाजार समिती प्रशासनाकडून दररोज पाचशे वाहनांचा लिलाव करण्याचे नियोजन करून टोकन वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली, परंतु रोखीचा अर्थव्यवहार व उत्तम दर्जाचा दर आदी कारणांमुळे येथे दररोज अडीच ते तीन हजार वाहनांची आवक होते.
ही आवक बघता फक्त पाचशे शेतकºयांना टोकन मिळत असल्याने कांदा विक्रीसाठी टोकन मिळावे यासाठी रात्री तीन वाजेपासूनच बाजार आवारात शेतकºयांनी
गर्दी केली होती. सकाळी आठ वाजता टोकन वाटण्याच्या ठिकाणी काही शेतकºयांनी गर्दी केल्याने बाजार समिती प्रशासन व शेतकºयांमध्ये शाब्दिक चकमकी झडल्या. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करीत टोकन वाटप काही अंशी सुरळीत केले.
टोकन वाटपप्रसंगी होत असलेली गर्दी बघता गुरु वारपासून टोकन न वाटता शेतकºयांनी फोनद्वारे बाजार समितीत कांदा विक्र ीसाठी नोंदणी करून लिलाव प्रक्रि या राबविण्याविषयीचे नियोजन सुरु आहे.
- तुषार गायकवाड, सहायक सचिव, बाजार समिती, उमराणे
गर्दी टाळण्यासाठी एका दिवसात ३०० ट्रॅक्टर्स वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. बाजार समितीकडून तीनशे शेतकºयांना दररोज टोकन वाटप करण्यात येईल. व्यापाºयांनी सुरुवातीलाच मोठी बीट देऊन लवकर लिलाव करावा, खोळंबा करू नये आदी सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी दोन कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली आहे.
- माणिक निकम, सचिव, बाजार समिती देवळा
देवळ्यात ३00 कांदा वाहनांचा लिलाव
देवळा : शासनाच्या आदेशान्वये येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरळीतपणे सुरू झाले असून, कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायांचे कसोशीने पालन करण्यात येते आहे. प्रतिदिन तीनशे ट्रॅक्टर्स वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. बाजार समिती आवारात यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंगळवारी (दि.७) सकाळी नवीन बाजार समिती आवाराच्या मुख्य गेटवर बाजार समितीच्या कर्मचाºयाने ट्रॅक्टरवर क्र मांक टाकून टोकन दिल्यानंतर त्या ट्रॅक्टरला बाजार आवारात प्रवेश देण्यात आला.
येवल्यात गुरुवारपासून खुल्या पद्धतीने लिलाव
येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येवला बाजार समितीच्या मुख्य येवला आवारावर गुरुवारपासून (दि.९) खुल्या पद्धतीने कांदा लिलाव होणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ व व्यापारी वर्ग यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला. एका दिवशी एकाच सत्रात सकाळी १0 ते दुपारी १ वाजेपर्यंत फक्त ५00 ट्रॅक्टर्समधील खुला कांदा लिलाव करण्यात येणार आहे.