शेतमाल वाहनांच्या रस्त्यांवर रांगाच रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:14 AM2021-03-19T04:14:01+5:302021-03-19T04:14:01+5:30
बाजार समितीत येणाऱ्या मालाची वाहने महामार्गापर्यंत लागत असल्याने वाढत्या उष्णतेने अचानक टोमॅटोची वाढलेली आवक की बाजार समितीच्या नियोजनाचा अभाव, ...
बाजार समितीत येणाऱ्या मालाची वाहने महामार्गापर्यंत लागत असल्याने वाढत्या उष्णतेने अचानक टोमॅटोची वाढलेली आवक की बाजार समितीच्या नियोजनाचा अभाव, असा प्रश्न शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून टोमॅटोची अचानक मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने बाजार समितीत येणाऱ्या वाहनांचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे तसेच टोमॅटो व अन्य कृषिमालाच्या वाहनांच्या रांगा शहरातील प्रमुख रस्त्यावर वाढू लागल्याने बाजार समिती ते किनारा हॉटेल महामार्गादरम्यान दुपारच्या सत्रात ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण होत आहे.
यामुळे शेतकरीवर्ग व वाहनचालकही कमालीचे त्रस्त झाले आहेत. भरउन्हात वाहने रस्त्यावर उभी राहणे, उन्हामुळे टोमॅटोसह अन्य पिकांचा दर्जा घसरणे, उन्हामुळे वाहनचालक व शेतकरी घामाघूम होणे अशा अनेक समस्या भेडसावू लागल्या आहेत. बाजार समिती प्रशासन व पोलीस प्रशासनानेही संयुक्तपणे धोरण ठरवून वाहतूक कोंडी होणार नाही याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थ यांच्याकडून होत आहे.
इन्फो
प्रवाशांचीही गैरसोय
वाहनांच्या या रंगांमुळे घोटी बसस्थानकात येणाऱ्या व जाणाऱ्या बसेसलाही खोळंबा होऊ लागल्याने बसेस मधील प्रवाशांना महामार्गाजवळ उतरून पायी घोटीत यावे लागत आहे तसेच बसस्थानकातील प्रवाशांनाही ओझे घेऊन दूरवर बसेसपर्यंत धावाधाव करावी लागत आहे.
फोटो- १८ घोटी मार्केट
घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर रस्त्यांवर शेतमालाच्या वाहनांची लागलेली रांग.
===Photopath===
180321\18nsk_25_18032021_13.jpg
===Caption===
फोटो- १८ घोटी मार्केट घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर रस्त्यांवर शेतमालाच्या वाहनांची लागलेली रांग.