बँका समोरील रांगा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:14 AM2021-03-31T04:14:57+5:302021-03-31T04:14:57+5:30
घरगुती मसाले बनविण्याच्या कामाला वेग नाशिक: ऊन वाढत असतानाच शहर परिसरात महिला मसाला बनविण्याच्या कामाला लागल्या आहेत. या दिवसात ...
घरगुती मसाले बनविण्याच्या कामाला वेग
नाशिक: ऊन वाढत असतानाच शहर परिसरात महिला मसाला बनविण्याच्या कामाला लागल्या आहेत. या दिवसात महिला घरगुती मसाले तसेच वाळवणाची कामे करण्याला प्राधान्य देतात. यासाठी बाजारात विविध प्रकारच्या लाला मिरच्या दखल झाल्या आहेत. या मिरच्यांना चांगली मागणी वाढली असल्याचे दिसत असल्याने मसाला बनविण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे दिसते.
फॅमिली डॉक्टरांकडे वाढली गर्दी
नाशिक: शहरात काेरोना रुग्ण वाढत असताना फॅमिली फिजिशियनकडे देखील रुग्णांची गर्दी वाढली आहे. सर्दी,खोकला, ताप तसेच डोकेदुखी यासारख्या आजाराचे रुग्ण खाजगी दवाखान्यात गर्दी करीत आहेत. नागरिकांमध्ये आरोग्याची काळजी निर्माण झाल्याने तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेतला जात आहे.
सकाळी फिरणारांकडून मास्ककडे दुर्लक्ष
नाशिक: पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडणारे ज्येष्ठ नागरिक तसेच इतरही अनेक लोक फिरताना तोंडाला मास्क लावत नसल्याचे चित्र आहे. पहाटे अनेक जण जॉगिंग करतात मात्र मास्क बरोबरच डिस्टन्स नियमाकडे देखील दुर्लक्ष झाल्याचे दिसते.