देवळाली कॅम्पला तपासणीसाठी रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:15 AM2021-04-22T04:15:08+5:302021-04-22T04:15:08+5:30
कॅन्टोमेन्ट हॉस्पिटल हे सरकारी असल्याने नागरिक कोविडची तपासणी करण्यासाठी येथे गर्दी करीत आहेत, याठिकाणी ८० बेड असून त्यातील ३० ...
कॅन्टोमेन्ट हॉस्पिटल हे सरकारी असल्याने नागरिक कोविडची तपासणी करण्यासाठी येथे गर्दी करीत आहेत, याठिकाणी ८० बेड असून त्यातील ३० बेड ऑक्सिजनचे असून उर्वरित बेड देखील ऑक्सिजनचे करावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या शिवाय कॅन्टोमेन्टच्या प्राथमिक शाळेत स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. मागील कोविड काळातील या हॉस्पिटलचा अनुभव व राष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या पुरस्काराने येथील डॉक्टर व कर्मचारी यांचे मनोबल वाढलेले आहे. देवळाली कॅम्प, भगूरसह शेजारील संसरी, नानेगाव, दोनवडे,राहुरी, शेवगे दारणा,लहवीत,वंजारवाडी, लोहशिगवे, शेनीत, साकुर, पांढुर्ली, बेलू, घोरवड, शिवडे, बेलदगाव, पळसे, शिंदे, मोहगाव, बाबळेश्वर आदी ५२ खेड्यातील नागरिक येथे उपचारासाठी दाखल होत असून, त्यातच सकाळी करोना टेस्टसाठी मोठी गर्दी होत असल्याने हॉस्पिटल प्रशासन देखील हैराण झाले आहे.
-------
चौकट===
पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था
पोलीस आयुक्त यांचे आदेशानुसार देवळालीतील सर्व रस्ते बंद करून केवळ आनंद रोड वडनेर रोड व पुन्हा याच मार्गी बाहेर पडणे हाच मार्ग आहे. त्यातच वडनेर रोडवर कॅन्टोमेन्ट हॉस्पिटल असल्याने तपासणी व लस घेण्यासाठी येणारे नागरिक यांची वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी होते. ही बाब कॅन्टोमेन्ट प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने रस्त्यावर होणारे पार्किंग बंद करून स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.