पहाटेपासुनच लागतात रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:10 AM2021-06-30T04:10:32+5:302021-06-30T04:10:32+5:30
नाशिक : क्लासेस सुरु करण्यास अद्याप परवानगी मिळालेली नसल्याने अनेक क्लास संचालकांनी सीईटी, नीट यांसह विविध परिक्षांचे क्रॅश कोर्स ...
नाशिक : क्लासेस सुरु करण्यास अद्याप परवानगी मिळालेली नसल्याने अनेक क्लास संचालकांनी सीईटी, नीट यांसह विविध परिक्षांचे क्रॅश कोर्स ऑनलाईन पध्दतीने सुरु केले आहेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिवसभर मोबाईलसमोर बसुन रहावे लागत आहे.
महाविद्यालयांचा थेट संपर्क
नाशिक : बारावीची परिक्षा न घेण्याचा निर्णय झाल्यानंतर अनेक महाविद्यालयांनी थेट विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली असून आपल्या महाविद्यालयात कोणकोणत्या सुविधा आहेत या ठिकाणी कोर्स केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधी याबाबत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना माहिती दिली जात आहे.
शेतकऱ्यांची कसरत
नाशिक : यावर्षी बियाण्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. मका, सोयाबिन, बाजरी, कापुस आदी प्रमुख पिकांसह सर्वच पिकांच्या बियाण्याच्या किमती वाढल्या आहेत यामुळे खरीप हंगामासाठी खर्च करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पेरण्यांची लगबग
नाशिक : मागील दोन तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांची पेरणीची लगबक सुरु झाली आहे. पुढील दोन तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली जात असल्याने त्यापुर्वी पेरणी आटोपण्याकडे कल वाढला आहे.
रेल्वे स्थानक परीसरात अडथळा
नाशिक : नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात रस्तयावर उभ्या राहाणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. याकडे वाहतुक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात असून याबाबत कारवाई करण्याची मागणी होत आहे.
किसान रेल्वेला प्रतिसाद
नाशिक : कोरोनाच्या काळात रेल्वेने सुरु केलेल्या किसान एक्सप्रेसला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या रेल्वेमुळे अनेक शेतकऱ्यांचा शेतीमाल कमी पैशांत परराज्यात जावु लागला आहे. जिल्ह्याच्या विविध भागातील शेतकरी रेल्वेकडे याबाबत चौकशी करताना दिसुन येत आहेत.
वृक्षारोपण कार्यक्रम
नाशिक : पावसाळा सुरु झाल्याने विविध सामाजीक संस्थांकडून वृक्षारोपन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामाध्यमातुन काहीजन निवडणुकांचीही तयारी करत असून या कार्यक्रमांना तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. लावलेली रोपे जगविण्याची जबाबदारीही तरुणांकडून घेतली जात आहे.
पर्यटन स्थळांवर हेतेय गर्दी
नाशिक : शहर परिसरातील पर्यटनस्थळांवर जाण्यास अद्याप बंदी असली तरी शनिवार, रविवारी अनेक नागरीक या परिसरांकडे धाव घेतात. यामुळे या ठिकाणांवर गर्दी होत असल्याचे दिसुन येत आहे. पोलिसांकडून याबाबत दक्षता घेतली जात नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.