देवळ्यात लसीकरणासाठी लागल्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 11:50 PM2021-06-26T23:50:28+5:302021-06-26T23:51:26+5:30

देवळा : देवळा तालुक्यासाठी कोविड-१९ लसीकरणासाठी ३७०० लसी उपलब्ध झाल्या होत्या. तालुक्यातील १४ केंद्रांवर शनिवारी (दि.२६) लसीकरण करून घेण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात युवकांमध्ये उत्साह दिसून आला. लोकांच्या प्रतिसादामुळे लसीकरण केंद्रावर रांगा लागल्या होत्या.

Queues for vaccinations at the temple | देवळ्यात लसीकरणासाठी लागल्या रांगा

भऊर येथे आरोग्य केंद्रासमोर लसीकरणासाठी लागलेल्या युवक व महिलांच्या रांगा.

Next
ठळक मुद्देतालुक्यासाठी उपलब्ध झाल्या होत्या ३७०० लस

देवळा : देवळा तालुक्यासाठी कोविड-१९ लसीकरणासाठी ३७०० लसी उपलब्ध झाल्या होत्या. तालुक्यातील १४ केंद्रांवर शनिवारी (दि.२६) लसीकरण करून घेण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात युवकांमध्ये उत्साह दिसून आला. लोकांच्या प्रतिसादामुळे लसीकरण केंद्रावर रांगा लागल्या होत्या.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर सर्वत्र लसीकरणाची मागणी वाढू लागली होती. सुरुवातीला लस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांमुळे लसीकरण केंद्रावर फारशी गर्दी दिसत नव्हती; परंतु आरोग्य विभाग, महसूल यंत्रणेने लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनतेमध्ये केलेल्या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम झाला व सर्वत्र लसीकरणाची मागणी वाढू लागली; परंतु लसींच्या तुटवड्यामुळे नागरिकांना लसीकरण केंद्रावरील लसींचा साठा संपल्यामुळे लसीकरण न करताच परत जावे लागत होते. तालुक्यासाठी येणारा लसींचा साठा अपुरा पडत होता. यामुळे संताप व्यक्त करण्यात आला. अखेर शनिवारी (दि.२६) तालुक्यासाठी ३७०० लसींचा पुरवठा करण्यात आल्यानंतर देवळा, भऊर, महाल पाटणे, रामेश्वर, मेशी, खुंटेवाडी, वाजगाव, लोहोणेर आदी १४ केंद्रांवर लसींचे वाटप करण्यात येऊन लसीकरण करण्यात आले. यावेळी १८ वर्षांपुढील सर्वांनाच लसीकरण करण्यात येणार असल्यामुळे अनेक केंद्रावर लसीकरणासाठी रांगा लागल्या होत्या.

शहरासाठी एकच केंद्र
देवळा शहरासाठी अवघे एकाच ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. शहरापासून दीड कि.मी. अंतरावर असलेल्या वाचनालयात सुरू झालेले लसीकरण केंद्र ज्येष्ठ नागरिकांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. शहराचा विस्तार व लोकसंख्या पाहता मध्यवर्ती ठिकाणी दुसरे लसीकरण केंद्र सुरू करून गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Queues for vaccinations at the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.