पिंपळगाव टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 06:30 PM2020-05-09T18:30:43+5:302020-05-10T00:52:39+5:30

पिंपळगाव बसवंत : रोजगार नसल्याने शहरांत गुजराण करणे मुश्कील झाल्याने हजारो आंतरराज्य व राज्यांतर्गत लॉक डाऊन शिथिल झाल्याने स्थलांतरित मजुरांचे लोंढे मुला-बाळांसह शेकडो कि.मी. ट्रक ,कंटेनर, रिक्षा ,पिकप व मिळेल त्या वाहनांच्या साह्याने व पायी चालत आपापल्या मूळ राज्यात किंवा गावाकडे निघाल्याने महामार्गावर वाहनांच्या लागल्याने टोल नाके व महामार्ग लॉक डाऊन झाले आहे.

 Queues of vehicles at Pimpalgaon toll plaza | पिंपळगाव टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा

पिंपळगाव टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा

Next

पिंपळगाव बसवंत : रोजगार नसल्याने शहरांत गुजराण करणे मुश्कील झाल्याने हजारो आंतरराज्य व राज्यांतर्गत लॉक डाऊन शिथिल झाल्याने स्थलांतरित मजुरांचे लोंढे मुला-बाळांसह शेकडो कि.मी. ट्रक ,कंटेनर, रिक्षा ,पिकप व मिळेल त्या वाहनांच्या साह्याने व पायी चालत आपापल्या मूळ राज्यात किंवा गावाकडे निघाल्याने महामार्गावर वाहनांच्या लागल्याने टोल नाके व महामार्ग लॉक डाऊन झाले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून संपूर्ण देशभर संचारबंदी असली तरी शहरांतील रोजगार गेल्याने लाखो लोक आपल्या कुटुंबियांसह चालतच गावी निघाले आहेत. त्यांच्यापैकी अनेकांना गावी पोहोचण्यासाठी ५०० ते १००० किलोमीटर अंतर पार करावे लागत आहे. रस्त्यात जेवणाची, चहा- पाण्याची सोय नाही. सर्व दुकाने बंद आहेत, खिशात पैसा नाही आणि अनेकांसोबत लहान मुले तरीही चालत निघालेल्या या लोंढ्यांना रोखणे, थांबवून ठेवणे पोलिसांना अशक्य झाले आहे. हजारो लोक एकत्र निघाल्याने संसर्गाचीही भीती वाढली आहे ,पण शहरांत रोजगार व जेवणखाण नसल्याने त्यांना घरी जाण्याची आस आहे. शहरांकडून गावांकडे निघालेले हे लोंढे केवळ सरकार पुढील नवे निर्णय घेऊन लॉकडाऊन वाढवेल की काय त्यामुळे लाखो नागरिक पायपीट करत घराकडे निघाले होते. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर मुंबईकडुन वाहनांतून येणाऱ्यांची गर्दी पुन्हा हजारोने वाढली.त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या गर्दीने महामार्ग व टोल नाके लॉकडाऊन झाले आहे.

Web Title:  Queues of vehicles at Pimpalgaon toll plaza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक