लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याने नाशकात रस्त्यांवर वाहनांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 02:41 PM2020-05-04T14:41:52+5:302020-05-04T14:50:41+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील रेड झोन आणि आॅरेंज झोनची यादी घोषित केली, त्यात नाशिक महापालिका क्षेत्रासह सहा तालुके रेड झोनमध्ये घोषित करण्यात आले आहेत. त्यात अत्यावश्यक सेवा असणाऱ्या दुकानांना परवानगी देण्यात आली असली तरी सोमवारी सकाळी शहरातील बहुतांशी दुकाने आणि व्यवसाय सुरू झाले. त्यामुळे सोमवारी सकाळपासून रस्त्यांवर अचानकपणे वाहनांची वर्दळ वाढल्याने मुंबईनाका, द्वारका, गंजमाळ, सीबीएस, शालीमारसाख्या महत्वाच्या ठिकाणी वाहनांची कोडीं होत असल्याचे दिसून आले.
नाशिक : कोरोनामुळे घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊमध्ये सोमवारी काहीशी शिथिलता मिळाल्याने नाशकातील वेगवेगळ््या भागातील रस्त्यांवर सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी दिसून आली. तर द्वारका, मुंबईनाका व सीबीएससारख्या काही ठिकाणी अक्षरश: वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.
राज्य सरकारने रविवारी लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली. त्यानंतर नाशिक जिल्हा आणि शहरातही शिथिलता मिळण्याची नाशिककरांना अपेक्षा होती. त्यानुसार सोमवारी सकाळीच बहुतांश दुकाने खुली झाली. गेल्या महिनाभरापासून शहरातील सर्व व्यवसाय बंद असल्याने दुकानदार अगतिक झाले होते. अनेकांनी रविवारी (दि.३) दुकाने स्वच्छ करून उघडण्याची तयारी सुरू झाली होती. त्यातच कोणती दुकाने उघडावी आणि बंद ठेवावी याबाबत संभ्रम असतानाच दुकाने सुरू झाली. नाशिक शहरात रुग्ण संख्या मर्यादित असली तरी महापालिका क्षेत्र रेड झोनमध्ये आहे. रविवारी (दि. ४) रात्री उशिरा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील रेड झोन आणि आॅरेंज झोनची यादी घोषित केली, त्यात नाशिक महापालिका क्षेत्रासह सहा तालुके रेड झोनमध्ये घोषित करण्यात आले आहेत. त्यात अत्यावश्यक सेवा असणाऱ्या दुकानांना परवानगी देण्यात आली असली तरी सोमवारी सकाळी शहरातील बहुतांशी दुकाने आणि व्यवसाय सुरू झाले. झेरॉक्स व स्टेशनरी, हार्डवेअर, गॅरेज, सर्व्हिस स्टेशन्स आणि अन्य अनेक दुकाने सुरू झाले आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपासून रस्त्यांवर अचानकपणे वाहनांची वर्दळ वाढल्याने मुंबईनाका, द्वारका, गंजमाळ, सीबीएस, शालीमारसाख्या महत्वाच्या ठिकाणी वाहनांची कोडीं होत असल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी पोलिसांना वाहतूक नियंत्रित करण्यासाठी कसरत करावी लागली, त्याचप्रमाणे अनेक नागरिकही खेरदीसाठी बाजारपेठेत आल्याने कोरोना साथरोग काळात लागू करण्यात आलेल्या फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे ठिकठिकाणी उल्लंघन होत असल्याचे दिसून आले.