राज्य परिवहन नाशिक आगारात नेमणार बुकिंग एजंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:33 AM2017-07-31T00:33:17+5:302017-07-31T00:33:44+5:30

अधिकाधिक प्रवाशांना आपल्याकडे वळविण्यासाठी आणि उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ एसटीत मोफत वायफाय सुविधा, आवडेल तेथे प्रवास योजना, आॅनलाइन बुकिंग, वातानुकूलित बसप्रवास अशा निरनिराळ्या योजना राबवित असते. हाच धागा पकडत राज्य परिवहन महामंडळाने प्रायोगित तत्त्वावर नाशिक व रायगड या दोन आगारांमध्ये खासगी बुकिंग एजंट नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

raajaya-paraivahana-naasaika-agaaraata-naemanaara-baukainga-ejanta | राज्य परिवहन नाशिक आगारात नेमणार बुकिंग एजंट

राज्य परिवहन नाशिक आगारात नेमणार बुकिंग एजंट

Next

भाग्यश्री मुळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अधिकाधिक प्रवाशांना आपल्याकडे वळविण्यासाठी आणि उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ एसटीत मोफत वायफाय सुविधा, आवडेल तेथे प्रवास योजना, आॅनलाइन बुकिंग, वातानुकूलित बसप्रवास अशा निरनिराळ्या योजना राबवित असते. हाच धागा पकडत राज्य परिवहन महामंडळाने प्रायोगित तत्त्वावर नाशिक व रायगड या दोन आगारांमध्ये खासगी बुकिंग एजंट नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सप्टेंबरपासून नाशिकमध्ये बुकिंग एजंट नेमून प्रवाशांना सेवा दिली जाणार आहे. या अंतर्गत इगतपुरी ते मालेगाव, नाशिक, ओझर, येवला, घोटी बायपास, आडगाव, औरंगाबादरोड, पाथर्डी फाटा, वडाळीभोई, चांदवड, उमराणे, सौंदाणे, टेहरे, द्वारका, पिंपळगाव आदी पॉइंटवर बुकिंग एजंट नियुक्त केले जाणार आहेत. हे बुकिंग एजंट त्या त्या थांब्यावर आलेल्या प्रवाशांना तिकीट देणार असून, प्रवासासंदर्भात त्यांना मार्गदर्शनही करणार आहेत. याशिवाय या एजंटांकडे बसचे लोकेशन समजू शकणारी यंत्रणा देण्यात येणार असून, बस या क्षणाला कुठे आहे हे ते सांगू शकणार आहेत. हे एजंट एकमेकांना बझरच्या सहाय्याने बस निघाल्याची, बस नंबर, बसमधील पॅसेंजरची संख्या, लागणारा कालावधी याबाबत माहिती देणार आहेत. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होणार असून, त्यांना इच्छित स्थळी पोहोचणे सुलभ होणार आहे. या एजंटांकडून तिकीट घेतल्यानंतर प्रवाशांना त्या मार्गावरून जाणाºया कोणत्याही बसमधून प्रवास करता येणार आहे. मात्र हे तिकीट रिझर्वेशनसारखे मानले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. परिवहन महामंडळाकडून आलेल्या या योजनेबाबत पूर्व पहाणी व अभ्यास करण्यात आला असून १ सप्टेंबरपासून योजनेस प्रारंभ होणार आहे.
एजंट ठरणार माहितीचे स्त्रोत
ही योजना प्रायोगिक तत्त्वावर असून, योजनेस अपेक्षितपणे चांगला प्रतिसाद मिळाला तर एजंटांची संख्या वाढवली जाणार असून नाशिक, रायगड याबरोबरच राज्याच्या इतर आगारांमध्येही योजना राबविली जाणार आहे. एजंटांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात येणार असून, बुकिंगबरोबरच ते प्रवाशांना बसचे लोकेशन, वेळ यांचीही माहिती देणार आहेत. याशिवाय एखाद्या प्रवाशाला इच्छित स्थळी जाण्यासाठी वारंवार गाड्या बदलाव्या लागणार असतील तर प्रवासाचा मार्ग, गावे, गाड्यांचे वेळापत्रक यांची सविस्तर माहितीही ते पुरविणार आहेत. प्रवाशांच्या मनातील शंका, प्रश्न यांचे निरसनही ते करणार आहेत. याशिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या विविध योजनांची माहितीही ते प्रवाशांना देणार आहेत.

Web Title: raajaya-paraivahana-naasaika-agaaraata-naemanaara-baukainga-ejanta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.