नवीन लेखक लिहिण्याचे धाडस करत नाहीत ही चिंताजनक बाब रावसाहेब कसबे : सावानातर्फे विविध वाङ्मयीन पुरस्कारांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 01:30 AM2017-11-11T01:30:11+5:302017-11-11T01:31:25+5:30
प्रतिभा माणसाला मिळालेली दैवी देणगी असून, अलीकडच्या काळात नवीन लेखक लिहिण्याचे धाडस करत नाहीत ही चिंतेची बाब असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे यांनी शुक्रवारी (दि. १०) सावानातर्फे आयोजित वाङ्मयीन पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी केले.
नाशिक : प्रतिभा माणसाला मिळालेली दैवी देणगी असून, अलीकडच्या काळात नवीन लेखक लिहिण्याचे धाडस करत नाहीत ही चिंतेची बाब असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे यांनी शुक्रवारी (दि. १०) सावानातर्फे आयोजित वाङ्मयीन पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी केले.
वाचनालयाच्या १७७ व्या वार्षिक समारंभानिमित्त वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात रावसाहेब कसबे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध वाङ्मयीन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना कसबे यांनी आजच्या युवा पिढीला शिकविण्याची आवश्यकता आहे, असेही कसबे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, यावेळी संदीप राऊत यांना ललितेतर ग्रंथासाठी डॉ. वि. म. गोगटे पुरस्कार, गणेश मतकरी यांना उमेदीने कथा लिहिणाºया लेखकास डॉ. अ. वा. वर्टी कथालेखक पुरस्कार, डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांना सामाजिक लेखनाबद्दल मु. ब. यंदे पुरस्कार, नीलम माणगावे यांना पु. ना. पंडित पुरस्कार, कादंबरी लेखनासाठी श्रीरंजन आवटे यांना कै. धनंजय कुलकर्णी पुरस्कार, चरित्रात्मक कादंबरीसाठी माणिक कोतवाल यांना अशोक देवदत्त टिळक पुरस्कार, तर शैक्षणिक प्रवास ग्रंथास देण्यात येणारा ग. वि. अकोलकर पुरस्कार भीमराव भोयर यांना देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पुरस्क ारार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर सावानाचे उपाध्यक्ष किशोर पाठक, नानासाहेब बोरस्ते, श्रीकांत बेणी, अॅड. भानुदास शौचे यांच्यासह पुरस्कारार्थी उपस्थित होते. अॅड. अभिजित बगदे यांनी सावानातर्फे वर्षभर राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांचा अहवाल उपस्थितांसमोर सादर केला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. शंकर बोºहाडे यांनी केले. दरम्यान, वार्षिक महोत्सवांतर्गत शनिवारी (दि. ११) बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश मतकरी यांनी मनोगत व्यक्त करताना या पुरस्कारामुळे मी गोंधळून गेलो असल्याचे सांगितले. मी माझ्याच वडिलांच्या कथांचे संपादन केले आहे आणि सावानातर्फे डॉ. अ. वा. वर्टी कथालेखक पुरस्कार उमेदीने कथा लिहिणाºयाला देण्यात येत असल्याने मला हा पुरस्कार का देण्यात आला, हे अजूनही कळले नसल्याचे सांगितले. परंतु यावेळी पुरस्कारार्थींचा परिचय करून देत असताना किशोर पाठक यांनी ‘एका मतकरीने दुसºया मतकरीला मिळालेल्या पुरस्काराचा हा आनंद आहे’ असे सांगत प्रसंगाला विराम दिला.
‘कलरफुल्ल होऊया’
पुरस्कारार्थी आपले मनोगत व्यक्त करत असताना नाशिकच्या वातावरणाचा उल्लेख ओघाने आला आणि हाच धागा पकडत किशोर पाठक यांनी सावानातही आता कर्मचाºयांच्या गणवेशामुळे सर्व वातावरण गुलाबी झाले आहे आणि हे वातावरण पाहता पदाधिकाºयांनाही गणवेश असायला हवा असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर बसलेले अॅड. अभिजित बगदे यांनी ‘ब्लॅक अॅण्ड व्हाइट’ ठेवा अशी सूचना केली. परंतु पाठक यांनी नुकत्याच झालेल्या फेरमतमोजणीनंतर आता आपल्याच पॅनलमधील सदस्य निवडून आलेले असताना कशाला हवे ‘ब्लॅक अॅण्ड व्हाइट’ असे म्हणत ‘कलरफुल्ल होऊन जाऊया’ असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.