शेतकऱ्यांचे रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 03:02 PM2019-12-02T15:02:42+5:302019-12-02T15:03:37+5:30

खेडलेझुंगे : यावर्षी अवकाळी पावसाने खेडलेझुंगेसह संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. सोयाबीन, मका, बाजरी, भुईमुग शेतातच सडली. लागवडीचा ...

 Rabbi season planning kolamdale! | शेतकऱ्यांचे रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडले !

शेतकऱ्यांचे रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडले !

Next
ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा फटका : बळीराजा हवालदिल, शासनाकडुन मदतीची प्रतीक्षाच


खेडलेझुंगे : यावर्षी अवकाळी पावसाने खेडलेझुंगेसह संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. सोयाबीन, मका, बाजरी, भुईमुग शेतातच सडली. लागवडीचा खर्च निघेल की नाही, याबाबत शेतकरी संभ्रमात आहेत. कर्ज काढणारे शेतकरी तर हतबल झाल्याचे दिसून येत आहेत. द्राक्ष बागांचे मोठ्याप्रमाणावर झालेले नुकसान आणि सद्या वातावरणातील बदलामुळे होणारे नुकसानीमुळे शेतकरी हतबल झालेला आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे नुकसान व वाढलेला भरमसाट खर्च यातून शेतकऱ्यांच्या हाती काय लागणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
वातावरणातील बदलामुळे पिकांवर मोठ्याप्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव बघावयास मिळत आहे. द्राक्षांसह पाले-फळ भाज्यांवर भुरी, डावण्या, मिलीबग, मावा, तुडतुडे, सनबर्ग, फुलगळ, फळांमध्ये अळ्या, करपा, फळकुज, तेल्या यांसारखे अनेक रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर होत असल्याने शेतकरी हैराण झालेला आहे.
खेडलेझुंगे, कोळगांव, कानळद, रूई-धानोरे, धारणगांव वीर/खडक, सारोळे थडीसह निफाड तालुक्यातील नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे होवुन महिना उलटुन गेलेला आहे. तालुकास्तरावरील कामे अपुर्ण असल्याने शेतकºयांना मदत मिळालेली नाही. शासनाने तात्काळ वाढीव मदत देवुन शेतकºयांना मरणाच्या दारातून परत आणावे. परतीच्या पावसाने कांद्याचे रोप पुर्ण वाहुन गेली, काही ठिकाणी सडुन गेली, त्यामुळे कांद्याचे उळे वाढीव दराने खरेदी करून कांद्याचे उळे टाकण्याची लगबग बºयाच भागात बघावयास मिळत आहे. परंतु सद्याच्या लहरी वातावरणामुळे रोप लागवडीसाठी उतरेल की नाही याची शाशंका मात्र शेतकºयांच्या मनामध्ये घर करु न आहे. (०२ खेडलेझुंगे १/२)

Web Title:  Rabbi season planning kolamdale!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक