येवला तालुक्यात रब्बी धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 10:36 PM2019-12-14T22:36:31+5:302019-12-15T00:59:28+5:30
येवला तालुक्यात गेल्या वीस ते बावीस दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांचे आक्रमण वाढल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसत असून, खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. हिवाळ्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, ढगही जमा होत असल्याने मी पुन्हा येईलची धास्ती घेतली असून, बळीराजामध्ये चिंतेचे ढग दाटले आहेत.
गोरख घुसळे ।
पाटोदा : येवला तालुक्यात गेल्या वीस ते बावीस दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांचे आक्रमण वाढल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसत असून, खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. हिवाळ्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, ढगही जमा होत असल्याने मी पुन्हा येईलची धास्ती घेतली असून, बळीराजामध्ये चिंतेचे ढग दाटले आहेत.
आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील मका, सोयाबीन, भुईमूग, कांदा, कांदारोपे व द्राक्षबागा या नगदी पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरीवर्ग संकटात सापडला आहे. आशाही परिस्थितीत शेतकरीवर्गाने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा या पिकांची लागवड केली तसेच उशिरा छाटणी केलेल्या द्राक्षबागांना चांगला बहार आल्याने शेतकरीवर्ग आनंदात असतानाच गेल्या वीस-बावीस दिवसांपासून येवला तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने व रोज पहाटे पडणाऱ्या धुक्यामुळे रब्बी हंगामातील या पिकांवर मावा, मर, अळी यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरीवर्ग ही पिके वाचविण्यासाठी पिकांवर महागडी औषध फवारणी करून पिके जागविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहे. अवकाळी पावसामुळे निम्यापेक्षा जास्त द्राक्षबागा या वांझोट्या निघाल्या असून, शेतकऱ्यांनी केलेला लाखो रु पयांचा खर्च पूर्णपणे वाया गेला आहे. ज्या शेतकºयांनी मागील महिन्यात उशिरा द्राक्षबागांची छाटणी केली आहे. अशा द्राक्षबागा सुस्थितीत आहेत. मात्र ढगाळ हवामान व धुक्याने तसेच दवबिंदूमुळे द्राक्षबागेवर डावणी, भुरी रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच द्राक्षबागांवर लष्करी अळीनेही मोठ्या प्रमाणात आक्र मण केल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. बागा वाचविण्यासाठी औषध फवारणीचा खर्च वाढल्याने शेतकरीवर्गाला चणचण भासू लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून येवला तालुक्यात ढगाळ हवामान निर्माण झाले असून, वातावरणात रोजच बदल होत आहे. या हवामानबदलाचा रब्बी पिकांवर विपरीत परिणाम होत असून, द्राक्षबागांवर डावणी, भुरी यासारख्या रोगांनी आक्र मण केले आहे तसेच लष्करी अळीनेही बागा धोक्यात आल्या आहेत, असे द्राक्ष उत्पादक रवींद्र शेळके म्ह्णाले. तर
अवकाळी पावसाने खरीप हंगामाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असून, आता रब्बी हंगामही सततच्या बदलत्या वातावरणाने धोक्यात आला आहे. तो वाया जातो की काय याची चिंता लागली असल्याचे शेतकरी सदाशिव बागुल यांनी सांगितले.