नाशिक जिल्ह्यात रब्बी पिकांचे क्षेत्र वाढले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 08:04 PM2020-01-28T20:04:37+5:302020-01-28T20:04:59+5:30
नाशिक जिल्हा खरिपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील १६३३ गावांपैकी जेमतेम ११० गावांमध्येच रब्बीचा हंगाम घेतला जातो तर दीड हजाराहून अधिक गावांची भिस्त खरिपावर आहे. त्यामुळे यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने खरिपाच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : यंदा पावसाळ्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकरी वर्ग आनंदात असताना रब्बीलाही हातभार लावण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात झोडपून काढणाऱ्या अवकाळी पावसाने खरिपाचे नुकसान केले असले तरी, या पावसामुळे जमिनीखालच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होऊन परिणामी रब्बी पिकाचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यातील एक लाख ३६ हजार ३०५ हेक्टरवर रब्बीची लागवड पूर्ण होऊन जवळपास १२१ टक्के पेरण्यात करण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच रब्बीच्या क्षेत्रात व पिकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक जिल्हा खरिपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील १६३३ गावांपैकी जेमतेम ११० गावांमध्येच रब्बीचा हंगाम घेतला जातो तर दीड हजाराहून अधिक गावांची भिस्त खरिपावर आहे. त्यामुळे यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने खरिपाच्या पेरण्यादेखील शंभर टक्क्यापेक्षा अधिक झाल्या. तर यंदा पहिल्यांदाच नद्या, नाले दुथडी भरून वाहिले, त्याचबरोबर धरणेदेखील ओव्हरफ्लो होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली. खरिपात शेतकऱ्यांना बंपर उत्पादन येण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच आॅक्टोबरच्या अखेरीस अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. सलग बारा दिवसांहून अधिक पावसाने हजेरी कायम ठेवली, त्यातून शेतकºयांच्या खरिपाच्या पिकांचे नुकसान झाले. त्याचबरोबर शेतात पाणी साचल्याने शेतकºयांचा रब्बी हंगाम लांबणीवर पडला. एरव्ही डिसेंबरमध्ये रब्बीच्या पेरण्या आटोपत असताना यंदा मात्र जानेवारीच्या तिसºया आठवड्यापर्यंत शेतकºयांनी पेरण्या केल्या. जिल्ह्यात एक लाख १२ हजार ९१६ हेक्टर रब्बीचे क्षेत्र असले तरी, यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे नद्या, नाले, विहिरींना पाणी असल्यामुळे बहुतांशी शेतकºयांनी रब्बीसाठी जमिनीची मशागत करून पीक पेरणी केली. त्यामुळे जवळपास २४ हजार हेक्टर क्षेत्राची वाढ झाली. सर्वच्या सर्व क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे असून, यात प्रामुख्याने गहू, मका (स्विटकॉर्न) व हरभरा या तीन पिकांचा समावेश असला तरी, मध्यंतरी हवामान बदलाचा फटका हरभºयाच्या क्षेत्राला बसला. त्यामुळे यंदा हरभºयाचे क्षेत्र कमी होऊन त्याऐवजी शेतकºयांनी कांदा लागवडीला प्राधान्य दिले.