रब्बी हंगामातील पिके करपू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 03:42 PM2019-02-14T15:42:58+5:302019-02-14T15:43:08+5:30
कळवण -लघु पाटबंधारे विभाग व तहसील कार्यालयाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार देवळीवणी लघुपाटबंधारे प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले नसल्याने अंबिका ओझर ग्रामस्थांनी व शेतकरी बांधवांनी नाराजी व्यक्त केली असून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन दोन दिवसात न मिळाल्यास पुन्हा प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकरी बांधवानी दिला आहे.
कळवण -लघु पाटबंधारे विभाग व तहसील कार्यालयाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार देवळीवणी लघुपाटबंधारे प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले नसल्याने अंबिका ओझर ग्रामस्थांनी व शेतकरी बांधवांनी नाराजी व्यक्त केली असून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन दोन दिवसात न मिळाल्यास
पुन्हा प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकरी बांधवानी दिला आहे.
कळवण तालुक्यातील अंबिका ओझर येथील विहिरींनी तळ गाठल्याने रब्बी हंगामातील पिकांना शेवटचे पाणी देता येत नसल्याने पिके करपू लागली आहेत. हंगाम वाया जाण्याची भीती आहे. यंदा कोणत्याच शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी हवालिदल झाला आहे. असे असतांना ऐन हातातोंडाशी आलेला घास पिकांना शेवटचे पाणी न मिळाल्यास पैसे, वेळ, मेहनत व पीक वाया जाणार असल्याने व धरणातील हक्काचे आरिक्षत पाणी मिळावे या मागणीसाठी शेतकर्यांनी दि.५फेब्रुवारी रोजी सहाय्यक अभियंता पाटबंधारे विभाग कार्यालय मानूर येथे बेमुदत आमरण उपोषण सुरु केले होते. या आंदोलनांना शिवसेना कळवण तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी पाठिंबा देत तहसीलदार कैलास चावडे व सहाय्यक अभियंता पाटबंधारे विभाग अभिजित रौंदळ यांच्याशी चर्चा करून शेतकर्यांची अडचण ओळखून पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने दखल घेत आंदोलनाच्या दुसर्यादिवशी एक वाजता नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत दि.११ फेब्रुवारी रोजी सकाळी पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले होते.
दोन दिवसात हक्काचे पाणी न मिळाल्यास पुन्हा प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी उपोषणकर्ते रामदास खिल्लारी, सरपंच गीताबाई खिल्लारी, इंदिराबाई भोये पोलीस पाटील, मन्साराम गांगुर्डे, विक्र म भोये, पांडुरंग भोये, कांतीलाल भोये, पंढरीनाथ भोये, वामन भोये, रमेश बढावे , साहेबराव भोये, एकनाथ भोये, बुधा मांडवी, भाऊसाहेब भोये, रामचंद्र भोये, काशीराम जोपळे, भाऊराव भोये , परशराम भोये, अविनाश अिहरे, दिपक भोये, बापु भोये, काशीराम भोये आदींसह शेतकरी बांधवानी दिला आहे.