ढगाळ हवामानामुळे रब्बी हंगाम संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 11:44 PM2020-03-09T23:44:21+5:302020-03-09T23:46:24+5:30
वटार : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला असून, रब्बी हंगाम संकटात आला आहे. या पट्ट्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक असून यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. बदलत्या हवामानामुळे कांदा पिकाला फटका बसत असून, महागडी औषधे फवारणी करून कांदा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. परिसरातील रब्बी हंगाम संकटात आल्याने शेतकºयांचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

कसमादे पट्ट्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. नगदी पीक म्हणून शेतकरी कांद्याकडे वळले आहेत. कांद्याला चालू वर्षी सुरु वातीपासून बाजारभाव चांगला असल्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी लागवड क्षेत्र वाढले आहे. पण निसर्गाच्या लहरीपणा आणि बदलत्या हवामान बळीराजाचा पिच्छा सोडण्यास तयार नाही.
परिणामी महागड्या औषधांची फवारणी करु न कांदा पीक वाचविण्याची वेळ परिसरातील बळीराजावर आली आहे. कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारी भाजीपाला पिकेही यावर्षी कवडीमोल भावात विकले जात असल्याने परिसरातील बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. सुरु वातीला चांगले वातावरण असल्यामुळे पिके जोमात होती पण गेल्या दोन ते तीन दिवसापासून अचानक वातावरणा मध्ये बदल झाल्यामुळे ऐन जोमात असलेल्या कांदा पिकाला मावा, तुडतुडे, पिवळेपणा, गेड्या वाळणे अशा अनेक रोगांनी ग्रासले आहे. पाच- सहा वर्षापासून वरु णराजा रु सल्याने परिसरात पाण्याचे मोठे संकट होते.
पण यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने बागायती क्षेत्रात वाढ होऊन गहु, हरभरा पिकांच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. वातावरणाचा फटका गव्हाला आणि हरभºयाला बसला आहे. ऐन गाठे भरण्याच्या वेळेस हरभरा पिकाला अळई लागल्याने हरभºयाच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे.
शेतकºयांना या वर्षासाठी शेतीचा रब्बी हंगाम उभा करण्यासाठी पैसाच उपलब्ध नसल्याने शेतकरी मोडकळीस आला होता परंतु व्याजाचे व उसनावरीने पैसे घेऊन रबी हंगामातील पिकांची लागवड केली. मात्र बदलत्या हवामानामुळे शेतकºयाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने पिके वाचवण्याचे बळीराजापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.दोन एकर कांदा लागवड करून दोन ते अडीच महिने झाले आहेत; पण बदलत्या हवामानामुळे कांद्याला अनेक रोगांची लागण होत आहे. महागडी फवारणी करूनही हवामान साथ देत नाही. बदलती शेती आणि पीक पद्धत पाहता शेती व्यवसाय आता एक प्रकारचा जुगारच झाला आहे. भांडवल टाकून पिके निघतील की नाही याचा भरवसा राहिला नाही.
- जिभाऊ खैरनार, कांदा उत्पादक शेतकरी, वटार