खंडणी मागणाºया महिलेस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:54 AM2017-09-21T00:54:32+5:302017-09-21T00:54:42+5:30

पंचवटी : मेरी-रासबिहारी लिंकरोड परिसरात राहणाºया दूध डेअरी चालकाला वेश्या व्यवसाय करत असल्याची बतावणी करून कारवाई न करण्यासाठी सहा लाख रुपयांची खंडणी मागणाºया टोळीतील तोतया महिला पोलीस उपनिरीक्षकाला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे.

 The racket demanded the arrest of the woman | खंडणी मागणाºया महिलेस अटक

खंडणी मागणाºया महिलेस अटक

Next

पंचवटी : मेरी-रासबिहारी लिंकरोड परिसरात राहणाºया दूध डेअरी चालकाला वेश्या व्यवसाय करत असल्याची बतावणी करून कारवाई न करण्यासाठी सहा लाख रुपयांची खंडणी मागणाºया टोळीतील तोतया महिला पोलीस उपनिरीक्षकाला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे.
मेरी-रासबिहारी लिंकरोड परिसरात राहणारे संतोष खैरे यांची परिसरात दूध डेअरी असून, दोन दिवसांपूर्वी चार ते पाच संशयित खैरे यांच्याकडे आले व त्यांच्या खोलीत राहणाºया मुली वेश्या व्यवसाय करत असल्याचे सांगून आम्ही पोलीस आहे, असे सांगून कारवाई टाळायची असेल तर सहा लाख रुपये द्या, अशी मागणी केली. त्यानंतर संशयित प्रतिभा भुजबळ या महिलेने पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगून खैरे याला खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली, त्यानंतर संशयित निघून गेले. सदर प्रकाराबाबत खैरे याला संशय आल्याने त्याने पोलीस ठाणे गाठून झाल्या प्रकाराबाबत माहिती दिली. संशयित महिला पोलीस उपनिरीक्षक सांगणाºया भुजबळ हिला फोन करून पैसे देण्याचे सांगून बोलावून घेतले व पोलिसांनी सापळा रचून तोतया पोलीस महिलेला ताब्यात घेतले.

Web Title:  The racket demanded the arrest of the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.