स्वत:ला पूर्ण क्षमतेने झोकून द्या राधाकृष्णन : विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत लोहोणेर येथे रोजगार मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:20 AM2017-11-11T00:20:35+5:302017-11-11T00:21:16+5:30

आजच्या या स्पर्धेच्या युगात तरु णांना यशस्वी व्हायचे असेल तर आपल्यातील अंतर्गत गुण जाणून भविष्यातील वाटचाल पूर्ण करण्यासाठी ज्या क्षेत्रात आवड असेल तेथे स्वत:ला पूर्ण क्षमतेने झोकून देऊन ज्ञान आत्मसात करावे व आपले जीवन यशस्वी करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी लोहोणेर येथील महारोजगार मेळाव्याप्रसंगी केले.

Radhakrishnan: Empower yourself with full potential: Employing employment at Lohonar in presence of students | स्वत:ला पूर्ण क्षमतेने झोकून द्या राधाकृष्णन : विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत लोहोणेर येथे रोजगार मेळावा

स्वत:ला पूर्ण क्षमतेने झोकून द्या राधाकृष्णन : विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत लोहोणेर येथे रोजगार मेळावा

Next
ठळक मुद्देकष्ट घेतल्यास भविष्य उज्ज्वल प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनाश्रीफळ देऊन सत्कार

लोहोणेर : आजच्या या स्पर्धेच्या युगात तरु णांना यशस्वी व्हायचे असेल तर आपल्यातील अंतर्गत गुण जाणून भविष्यातील वाटचाल पूर्ण करण्यासाठी ज्या क्षेत्रात आवड असेल तेथे स्वत:ला पूर्ण क्षमतेने झोकून देऊन ज्ञान आत्मसात करावे व आपले जीवन यशस्वी करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी लोहोणेर येथील महारोजगार मेळाव्याप्रसंगी केले.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत येथील कसमादे परिसर विकास मंडळाच्या वतीने महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आमदार राहुल अहेर होते. राधाकृष्णन म्हणाले म्हणाले की, सुरुवातीला कष्ट घेतल्यास भविष्य उज्ज्वल होत असते, त्यासाठी तरु णांना योग्य मार्गदर्शन मिळविणे महत्त्वाचे असते. ग्रामीण भागातील तरुणांना या मेळाव्याच्या निमित्ताने ही संधी उपलब्ध झाली असून, त्याचा लाभ तरुणांनी घ्यावा, असे प्रतिपादन केले. यावेळी अहेर म्हणाले की, येणाºया काळाची गरज लक्षात घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांसाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सुरू केली आहे. तसेच भविष्यात ग्रामीण भागातील तरुणांसाठी अनेक योजना राबविण्याचा आमचा मानस आहे. यावेळी राष्ट्रीय युवा संघाचे क्षेत्रीय अधिकारी विवेक सुर्वे, दयाल कांगणे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार कैलास पवार, पळसुले, जितेंद्र कामटीकर, संपत चाटे, पंकज निकम, कल्पना देशमुख, रामदास देवरे, पोपट पगार, भरत पाळेकर, रमेश शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कसमादे परिसर विकास मंडळाचे प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे व प्रकल्प अधिकारी हंसराज अहेर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राजेंद्र गांगुर्डे व मनीषा शिरसाठ या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकाºयांच्या हस्ते कौशल्य प्राप्त केलेल्या पाच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक संस्थेचे चिटणीस कृष्णा बच्छाव यांनी केले. तर प्रा. भगवान अहेर यांनी आभार मानले. या महारोजगार मेळाव्यात परिसरातून सुमारे ६५० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला तर सुमारे १४ कंपन्यांनी या रोजगार मेळाव्यास आपली उपस्थिती नोंदवून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

Web Title: Radhakrishnan: Empower yourself with full potential: Employing employment at Lohonar in presence of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.