रहाडी-नारळा रस्ता वाहतुकीस खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:44 AM2018-06-22T00:44:42+5:302018-06-22T00:44:42+5:30
ममदापूर : गेल्या ३५ वर्षांपासून वाहतुकीस बंद असलेला तालुक्यातील रहाडी-नारळा रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आल्याने व रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
ममदापूर : गेल्या ३५ वर्षांपासून वाहतुकीस बंद असलेला तालुक्यातील रहाडी-नारळा रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आल्याने व रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
रहाडी-नाराळा जिल्हा परिषदेचा ग्रामीण मार्ग मागील ३५ वर्षांपासून अतिक्र मणामुळे बंद झालेला होता. या रस्त्यावर दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे रहाडी व नारळा या दोन गावांचा संपर्क तुटलेला होता. सदर रस्ता बंद झाल्यामुळे शेतकºयांना मालवाहतूक करणे, विद्यार्थ्यांना शाळेत जाणे तसेच रुग्णांना घेऊन जाणे अवघड झाले होते.
पावसाळ्यात तर चार महिने चार फूट पाण्यातून जावे लागत असे. या रस्त्याचे अतिक्रमण काढून रस्ता नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करणे अत्यंत गरजेचे होते. अतिक्रमण केलेल्या सर्व शेतकरी व नागरिकांना एकत्र करून रस्त्यांचे महत्त्व पटवून सांगितले. शासकीय रस्ता असल्याने आज नाही तर भविष्यात केव्हाही अतिक्रमण काढावेच लागेल. अतिक्रमणामुळे नागरिकांची वाहतुकीसाठी होणारी अडचण समजून सांगितली. सर्व शेतकरी एकमताने अतिक्रमण काढण्यास तयार झाले.