कादवाचे विस्तारीकरण आवश्यक : श्रीराम शेटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 01:46 AM2018-09-22T01:46:02+5:302018-09-22T01:46:20+5:30

शासनाने इथेनॉल प्रकल्पाबाबत सकारात्मक धोरण अवलंबले असून त्याचा फायदा करून घेणे आवश्यक आहे . त्यासाठी गाळप वाढणे गरजेचे आहे. कादवाच्या कार्यक्षेत्रात यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून, जिल्ह्यातील ऊस उत्पादकही कादवाला ऊस देण्यासाठी उत्सुक आहेत. वेळेत ऊस तोडणी व्हावी यासाठी कमी दिवसात जास्तीचे गाळप करणे गरजेचे असून त्यासाठी विस्तारीकरण आवश्यक असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले .

 Radiation needs to be expanded: Shriram Shete | कादवाचे विस्तारीकरण आवश्यक : श्रीराम शेटे

कादवाचे विस्तारीकरण आवश्यक : श्रीराम शेटे

googlenewsNext

दिंडोरी : शासनाने इथेनॉल प्रकल्पाबाबत सकारात्मक धोरण अवलंबले असून त्याचा फायदा करून घेणे आवश्यक आहे . त्यासाठी गाळप वाढणे गरजेचे आहे. कादवाच्या कार्यक्षेत्रात यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून, जिल्ह्यातील ऊस उत्पादकही कादवाला ऊस देण्यासाठी उत्सुक आहेत. वेळेत ऊस तोडणी व्हावी यासाठी कमी दिवसात जास्तीचे गाळप करणे गरजेचे असून त्यासाठी विस्तारीकरण आवश्यक असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले .  कादवा सहकारी साखर कारखान्याचा ४२ वा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा चेअरमन शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बॉयलर पूजन कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद सौ व श्री पाटीलबुवा हरिभाऊ बर्डे, सौ. व श्री तानाजी निवृत्ती कामाले यांच्या हस्ते झाली.
पुढे बोलताना श्रीराम शेटे म्हणाले, आपण गेल्या १० वर्षात मोठ्या प्रमाणावर मशिनरीत बदल , दुरुस्ती केल्यामुळे आज कारखाण्याची गाळप क्षमता वाढली असून गळीताचे दिवस कमी झाले. आपल्याला फक्त साखरेवर विसंबून न राहता भविष्याची परिस्थिती ओळखून विस्तारीकरण तसेच इथेनॉल प्रकल्प उभारणीच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घ्यावा लागेल. टप्प्या टप्प्याने द्यावयाचे एफआरपी बद्दल बोलताना ते म्हणाले बँक आपल्याला साखर पोत्यावर १७०० ते १८०० रु पये उचलदर देईल त्यात थोडेफार पैसे टाकून पहीला हप्ता २००० व उर्वरीत रक्कम ही हंगाम संपल्यानंतर ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, डॉ. भारती पवार, गणपतराव पाटील, दत्तात्रय पाटील, बाळासाहेब देशमुख, आत्माराम पाटील, युनियनचे अध्यक्ष सुनील कावळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
पूर्वी पूर्व भागात ऊस होता तेव्हा कपाती झाल्या म्हणूनच आज कारखाना उभाआहे हे विसरता येणार नाही २००७ ला काय परिस्थिती होती आज काय आहे हे समजून घ्या विस्तारीकरण डीस्टिलरी इथेनॉल हे यापूर्वीच व्हायला हवे होते आता संधी आली आहे ती सोडू नये.
- आत्माराम पाटील, सोनजांब
कारखान्याच्या विकासाच्या दृष्टीने विस्तारीकरन व इथेनॉल प्रकल्प उभारणीला आमचा विरोध नाही हवेतर शेअर्सची किंमत वाढवा परंतु ऊस बिलातून कोणीतीही रक्कम कपात करू नये.
- बाळासाहेब देशमुख , लखमापूर

Web Title:  Radiation needs to be expanded: Shriram Shete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.