रेशन दुकानदार संपावर ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 01:27 AM2017-07-30T01:27:17+5:302017-07-30T01:27:36+5:30
रेशन दुकानदारांना भ्रष्टाचारी ठरविले जात असेल तर त्यांनी केलेला गैरव्यवहार हा अधिकाºयांसाठीच होता, असा आरोप करून माजी खासदार गजानन बाबर यांनी करून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत दुकानदार धान्य उचलणार नसल्याची घोषणा केली आहे.
नाशिक : रेशन दुकानदारांना चुकीचे व भ्रष्टाचारी ठरविले जात असेल तर त्यांनी केलेला गैरव्यवहार हा अधिकाºयांसाठीच होता, असा खळबळजनक आरोप करून रेशन दुकानदार संघटनेचे राज्य अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांनी करून शासनाकडून जोपर्यंत रेशन दुकानदारांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत दुकानदार धान्य उचलणार नसल्याची घोषणा केली आहे. रेशन दुकानदारांच्या राज्य संघटनेच्या पदाधिकाºयांची बैठक शनिवारी नाशिकमध्ये घेण्यात आली या बैठकीत येत्या १ आॅगस्टपासून सुरू होणाºया आंदोलनावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी बाबर बोलत होते. सरकार रेशन दुकानदारांना भ्रष्ट व लबाड ठरवित असेल तर त्यातील वाटा शासकीय सेवेतील अधिकाºयांनाही वेळोवेळी मिळत गेला, आम्ही एकट्यासाठी ही लबाडी केली नाही, अशी कबुली देत बाबर यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पारदर्शक व्यवसायासाठी रेशन दुकानदार तयार असून, शासनानेदेखील त्यात पारदर्शकता दाखवावी, असे आवाहन केले. शासनाने घासलेट वितरणासाठी विविध अटी टाकून कोटा कमी केल्यामुळे घासलेट विक्रेत्यांचा रोजगार हिरावला गेला आहे. आता रेशनवरही अशाच प्रकारचे बंधने लादली जात असल्याने भविष्यात हा व्यवसाय बंद करावा लागेल त्यामुळे दुकानदारांच्या अस्तित्वासाठी आता सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असून, १ आॅगस्टपासून कोणीही माल घेऊ नये व वितरण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे, मालेगावचे अध्यक्ष निसार शेख, गणपत पाटील, संजय साबळे, गिरीश मोहिते यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर बाबर यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हा पुरवठा अधिकाºयांची भेट घेऊन संपाचे निवेदन सादर केले. अन्नधान्य महामंडळ स्थापन करावे, रेशन दुकानदारांना दरमहा ४० हजार रुपये मानधन द्यावे, कमिशन वाढवून द्यावे आदी मागण्या त्यात करण्यात आल्या. पुरवठा अधिकाºयांनी त्यांना संपावर न जाण्याचे आवाहन केले, मात्र त्यांनी ठाम राहण्याचा निर्णय जाहीर केला.