राफेलचा एचएएलला फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:39 AM2018-08-13T00:39:53+5:302018-08-13T00:41:42+5:30

राफेल मिग विमान खरेदी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरी माहिती दडवत असून, संरक्षण क्षेत्रातील हा सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. या मिग विमानांच्या देखभाल दुरुस्तीचा करारही अनिल अंबानी यांच्या नवख्या कंपनीशी केल्यामुळे देशातील एचएएलसारख्या कारखान्यांत कामच उरणार नाही. त्यामुळे हे कारखाने बंद होऊ शकतील, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली.

Rafael HAL blow! | राफेलचा एचएएलला फटका!

राफेलचा एचएएलला फटका!

Next
ठळक मुद्देपृथ्वीराज चव्हाणकेंद्राच्या करारामुळे जेट विमाने दुरुस्ती कारखाने बंद पडण्याची भीती

नाशिक : राफेल मिग विमान खरेदी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरी माहिती दडवत असून, संरक्षण क्षेत्रातील हा सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. या मिग विमानांच्या देखभाल दुरुस्तीचा करारही अनिल अंबानी यांच्या नवख्या कंपनीशी केल्यामुळे देशातील एचएएलसारख्या कारखान्यांत कामच उरणार नाही. त्यामुळे हे कारखाने बंद होऊ शकतील, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली.
कुर्तकोटी शंकराचार्य संकुल येथे लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमांतर्गत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले
होते. आमदार हेमंत टकले यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी राफेल हा संरक्षण क्षेत्रातील आजवरचा सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचा पुनरुच्चार केला.
पीएमओ मंत्री असताना
देश कळला
पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात पीएमओ कार्यालयाचा राज्यमंत्री असल्यामुळे सर्व मंत्री, सर्व खात्याचे सचिव, दोन राज्यांची भांडणे, दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमधील वाद या कार्यालयाच्या अंतर्गत सोडविण्याचे काम माझ्याकडे होते. या काळात मला बरेच काम करता आले. बरेच काही शिकायला मिळाले. देशाचा कारभार हे अनुभवता आले, असे चव्हाण यांनी सांगितले.
माता-पित्यांच्या राजकीय
आठवणींना उजाळा
या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीला उजाळा मिळाला. यावेळी त्यांनी वडील आनंदराव चव्हाण आणि आई प्रेमलाताई यांच्या राजकीय कारकिर्दीचा पट उलगडला. हे दोघेही कॉँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. कºहाडच्या शाळेपासून ते अमेरिकेतील उच्च शिक्षणापर्यंतचा प्रवास सांगितला. अ‍ॅरोनॉटीकल तसेच संगणकीय क्षेत्रातील काम आणि राजीव गांधी यांच्या आग्रहामुळे राजकारणात आल्याचे सांगत त्यांनी राजकीय प्रवास त्यांनी उलगडला.

Web Title: Rafael HAL blow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.