रफी यांच्या आठवणींना उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 12:40 AM2017-08-01T00:40:51+5:302017-08-01T00:41:02+5:30
‘यार जिन्हे तुम भूल गए, वो दिन याद करों’, ‘बने चाहें दुश्मन जमाना हमारा’ आदी गीतांसह एक फुल दो माली चित्रपटातील ‘ओ नन्हे से फरिश्ते’, आमने सामनेचे ‘मेरे बैचेन दिल को’, नागीनमधील ‘तेरे एश्कका मुझपर’ अशा वेगवेगळ्या गाण्यांच्या माध्यमातून आर. एम. ग्रुपने मोहम्मद रफी यांच्या स्वरमयी आठवणींना उजाळा दिला.
नाशिक : ‘यार जिन्हे तुम भूल गए, वो दिन याद करों’, ‘बने चाहें दुश्मन जमाना हमारा’ आदी गीतांसह एक फुल दो माली चित्रपटातील ‘ओ नन्हे से फरिश्ते’, आमने सामनेचे ‘मेरे बैचेन दिल को’, नागीनमधील ‘तेरे एश्कका मुझपर’ अशा वेगवेगळ्या गाण्यांच्या माध्यमातून आर. एम. ग्रुपने मोहम्मद रफी यांच्या स्वरमयी आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते, आवाजाचे जादूगार मोहम्मद रफी यांच्या स्मृतीदिनाचे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित ‘मोहम्मद रफी साहब के सरताज गीत’ या संगीत कार्यक्रमातून आर. एम. ग्रुपने प्रकाश साळवे निर्मित संगीत कार्यक्रमाच्या माध्यमातून गायक दीपक लोखंडे, श्रीकांत श्रवण, नमिता राजहंस, अॅना कांबळे, कांचन, अंकलगी व जितू देवरे यांनी दिलने प्यार किया हैं, अगर तेरा जलवा, यहाँ मैं अजनबी हूं, तुम अकेले कभी बाग में, पत्थर के सनम, ले गयी दिल, पुछो ना यार क्या हुवा आदी गाणी सादर करून रसिकांची दाद मिळविली. त्यांना हार्मोनिअमवर ध्रुवकुमार तेजाळे, सॅक्सोफोनवर सुधाकर अमृतकर, सिन्थेसायझरवर जयेश भालेराव व अनुष आव्हाड, ढोलकीवर फारुक पिरजादे, तबला पुष्कराज साळवे, गिटार प्रसाद अय्यर, बाबा सोनवणे व संजय हिवराळे यांनी संगीतसाथ केली. तर तुषार बागुल यांनी प्रकाश व अमर भोळे यांनी निवेदन केले.