चुरशीच्या लढतीत राहुल ढिकले यांचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 01:23 AM2019-10-25T01:23:22+5:302019-10-25T01:26:44+5:30

नाशिक पूर्व विधाससभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप यांचा १२ हजार मतांनी पराभव केला आहे.

 Rahul Dhikale's victory in the Churshi fight | चुरशीच्या लढतीत राहुल ढिकले यांचा विजय

चुरशीच्या लढतीत राहुल ढिकले यांचा विजय

googlenewsNext

नाशिक : नाशिक पूर्व विधाससभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप यांचा १२ हजार मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीत अ‍ॅड.राहुल ढिकले यांना ८५ हजार २३२ मते मिळविली, तर बाळासाहेब सानप यांना १३ हजार २१९ मते मिळाली असून, या निवडणुकीतून नाशिक पूर्व मतदारसंघात पुन्हा एकदा ढिकले घराण्यातून आमदार निवडून आला आहे.
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजेच्या सुमारास सुरुवात होताच अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी पहिल्या फेरीतच सुमारे ९३५ मतांची आघाडी घेतली. त्यानंतर ही आघाडी अशीच दुसऱ्या अणि तिसºया फेरीतही वाढत गेली. चौथ्या फेरीत सानप यांना २६६ मतांची आघाडी मिळाली. परंतु, त्यामुळे ढिकले यांची आघाडी कमी होऊ शकली नाही. त्यानंतर थेट सतराव्या फेरीपर्यंत राहुल ढिकले फेरीनिहाय आघाडी घेत राहिले. त्यामुळे त्यांना सराव्या फेरीअखेर ९ हजार ३८२ मतांची आघाडी मिळाली होती. मात्र अठराव्या फेरीमध्ये पुन्हा एकदा बाळासाहेब सानप यांनी ढिकलेंपेक्षा ३२० मते अधिक घेतली. त्यानंतर हा कल सुरू राहण्याच्या शक्यतेने विजयी आघाडी असतानाही अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी कौल पूर्णपणे स्पष्ट होईपर्यंत प्रतीक्षा करण्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले. मात्र हा मताधिक्क्याचा कल पुढे टिकला नाही. त्यामुळे ढिकले यांच्या विजयी आघाडीत वाढ होत गेल्याने विसाव्या फेरीचे मतदान सुक्रू असताना बाळासाहेब सानप यांनी अखेर पराभवाचे संकेत दिसू लागल्याने मतमोजणी सोडले. त्यानंतर एकविसावी फेरी सुरू झाल्यानंतर अ‍ॅड. ढिकले मतमोजणी केंद्रावर पोहोचल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार गणेश उन्हवणे यांच्यासह अपक्ष महेश आव्हाड यांनी मतमोजणी सुरू असताना यंत्रांवर उमेदवार प्रतिनिधींच्या स्वाक्षºया नसल्याने आक्षेप घेतल्यामुळे सुमारे दीड तास मतमोजणी खोळंबली होती.
विजयाची तीन कारणे...
1मनसेकडून उमेदवारी मिळण्याची चिन्ह असतानाही मतदारांचा कल ओळखून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करून सत्ताधारी पक्षाकडून निवडणूक लढवली.
2नाशिक पूर्व मतदारसंघातून मनसेची उमेदवारी निश्चित असल्याने जवळपास दोन ते अडीच वर्षांपासून निवडणुकीची तयारी केली होती.
3वडील उत्तमराव ढिकले नाशिकमधून खासदार आणि नाशिकपूर्वमधून आमदार राहिल्याने लाभलेला राजकीय वारसा.
सानपांच्या पराभवाचे कारण...
भाजपने तिकीट कापल्यानंतर ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी मिळविली. मात्र काँग्रेसच्या उमेदवाराची माघार करवून आणण्यात अपयश आले. तसेच थेट मुख्यमंत्र्यांनी प्रचारातून केलेले भ्रष्टाचाराचे आरोप पराभवास कारणीभूत ठरले.
पराभूत उमेदवार पक्ष मिळालेली मते
२ अमोल पठाडे बसपा 00,843
३ गणेश उन्हवणे कॉँग्रेस 4,452
४ बाळासाहेब सानप राष्टÑवादी 74,304
६ संतोष नाथ वंचित ब.आ. 10,051 ७ महेश आव्हाड अपक्ष 00,121
८ नितीन गुणवंत अपक्ष 00,413
९ भारती मोगल अपक्ष 00,375
१० शरद बोडके अपक्ष 00,154
११ सुभाष पाटील अपक्ष 00,217
१२ संजय भुरकुड अपक्ष 00,357
१३ वामन सांगळे अपक्ष 00,231

Web Title:  Rahul Dhikale's victory in the Churshi fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.