त्र्यंबकेश्वरमध्ये खाद्यतेलाच्या मिलवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:18 AM2021-03-09T04:18:11+5:302021-03-09T04:18:11+5:30
अन्न व औषध प्रशासन विभागाने सोमवारपासून (दि.१) सुटे खाद्यतेल (लूज ऑइल) विक्रीवर बंदी घातली आहे. तरीही जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये ...
अन्न व औषध प्रशासन विभागाने सोमवारपासून (दि.१) सुटे खाद्यतेल (लूज ऑइल) विक्रीवर बंदी घातली आहे. तरीही जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये विक्रेत्यांकडून या नियमाचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने अन्न व औषध प्रशासनाने त्र्यंबकेश्वर येथील कडलग चाळीतील श्री स्वामी समर्थ ऑइल मिल या होलसेल खाद्यतेल विक्री करणाऱ्या दुकानावर धाड टाकली. अस्वच्छ आणि घाणीचे साम्राज्य असलेल्या जागेेत खाद्यतेलाचे लोखंडी टाक्या, ड्रम व पत्र्याचे डबे भरून ठेवलेले आढळून आले. याशिवाय सोमवारपासून सुटे खाद्यतेल विक्रीला बंदी असताना सुटे खाद्यतेल सर्रास विक्री होत असल्याचे आढळून आले. या लोखंडी टाक्यांमध्ये खाद्यतेलाची भेसळ असल्याचा संशय आल्याने तेलाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच रासायनिक ड्रममध्ये खाद्यतेलाचा साठा आढळला. लोखंडी टक्क्यांवर, ड्रमवर नियमाप्रमाणे लेबल लावण्यात आलेले नव्हते. संशयास्पद खाद्यतेलाचा साठा आढळून आल्याने नऊ लाख चार हजार ३०० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त यू.एस. लोहकरे,अन्नसुरक्षा अधिकारी संदीप देवरे, ए.यू.रासकर आदींनी ही धडक कारवाई केली.
इन्फो :
खाद्यतेलाचे नमुने ताब्यात
1) रिफाइण्ड सोयाबीन खाद्यतेल पाच हजार ९९६.८ किलो.
रिफाइण्ड सोयाबीन तेल बॅरल एक हजार ४३८.४ किलो.
3) रिफाइण्ड सनफ्लॉवर तेल (राजहंस) ७४९.४ किलो. एकूण आठ हजार १८४ किलो वजनाचे आणि नऊ लाख चार हजार ३०० रुपये किमतीचे खाद्यतेल जप्त करून त्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.
--
०८ऑइल/१/२
===Photopath===
080321\08nsk_91_08032021_13.jpg~080321\08nsk_92_08032021_13.jpg~080321\08nsk_93_08032021_13.jpg
===Caption===
जप्त केलेले तेल डबे व ड्रम~जप्त केलेले तेल डबे व ड्रम~जप्त केलेले तेल डबे व ड्रम