घोटेवाडी येथे अवैध दारू अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:15 AM2021-05-21T04:15:33+5:302021-05-21T04:15:33+5:30

सिन्नर : तालुक्यातील घोटेवाडी येथे अवैध दारू अड्ड्यावर महसूलच्या पथकाने धाड टाकून दारू विक्रेत्यास १० हजारांचा दंड ठोठावल्याची घटना ...

Raid on illegal liquor den at Ghotewadi | घोटेवाडी येथे अवैध दारू अड्ड्यावर छापा

घोटेवाडी येथे अवैध दारू अड्ड्यावर छापा

Next

सिन्नर : तालुक्यातील घोटेवाडी येथे अवैध दारू अड्ड्यावर महसूलच्या पथकाने धाड टाकून दारू विक्रेत्यास १० हजारांचा दंड ठोठावल्याची घटना बुधवारी (दि.१९) सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. महसूल पथकाने वावी पोलिसांना या कारवाईची माहिती देताच त्यांनी तातडीने घटनास्थळी पोलीस पथक पाठवून दारू विक्रेत्याकडील मुद्देमाल जप्त करीत त्याच्यावर अवैध दारू बाळगून त्याची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

घोटेवाडी येथे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून गेल्या १३ दिवसांत ६ जणांचा बळी गेला आहे. तर २० रुग्ण बाधित असून गावात आणखीही अनेक जणांना या आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. अशा बिकट परिस्थितीत येथील अवैध दारू अड्ड्यावर परिसरातील गावांच्या रहिवाशांची दारू घेण्यासाठी होणारी गर्दी कोरोना संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याची तक्रार तहसीलदार राहुल कोताडे आणि वावी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने केली होती. बुधवारी सदर अवैध दारू अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी धाडले असता तेथे अवैध दारू विक्री सुरू असल्याचे दिसून आले. नायब तहसीलदार ललिता साबळे यांनी तत्काळ सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी या बिटचे हवालदार दशरथ मोरे, नितीन जगताप, भास्कर जाधव, गोविंद सुरेवाड यांना घटनास्थळी पाठवले. कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करून अवैधरीत्या दारू विक्री केल्याप्रकरणी सदर दारू विक्रेता भाऊराव रामचंद्र सरोदे (३६) यास १० हजारांचा दंड ठोठावला. दरम्यान, वावी पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून अवैध दारू बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Raid on illegal liquor den at Ghotewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.