कळवणला दारू अड्ड्यांवर छापे
By admin | Published: April 24, 2017 01:28 AM2017-04-24T01:28:15+5:302017-04-24T01:28:58+5:30
कळवण : कळवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने गावठी दारूचे अड्डे चालविणाऱ्यांविरोधात कळवण पोलिसांनी ‘आॅपरेशन वॉश आउट’ हाती घेतले आहे
कळवण : कळवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने गावठी दारूचे अड्डे चालविणाऱ्यांविरोधात कळवण पोलिसांनी ‘आॅपरेशन वॉश आउट’ हाती घेतले आहे. या मोहिमेनुसार नवी बेज, पिळकोस, भेंडी, बिजोरे, विसापूर, गांगवण, बगडू, चाचेर, भादवण आदी परिसरात खुलेआम सुरू असलेले गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करून विक्रेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.यामुळे परिसरातील सर्व गावठी
दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले
आहे.
पिळकोस शिवारातील गिरणा नदीकाठी बाभळीच्या घनदाट झुडपात गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती कळवण पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार सकाळी ७ वाजेच्या सुमारास कळवणचे पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद जाधोर, अविनाश गडाख, पोलीस हवालदार बबन पाटोळे, शिवाजी शिंदे, सुरेश पवार, चव्हाण, जगन पवार यांनी दारू भट्टीचा शोध घेत १५० लिटर रसायन व हातभट्टीचे साहित्य नेस्तनाबूत केले. २० हजार किमतीचे रसायन व साहित्य उद्ध्वस्त केले. येथील गावठी दारूचा अड्डा नष्ट केल्याने परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
गावठी दारू बनविणाऱ्या एका इसमाला पोलिसांची चाहूल लागल्याने तो आधीच फरार झाला.
नवी बेज परिसरातील दारू
विक्र ी समूळ नष्ट करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहे. राज्य उत्पादन शुल्क या विभागानेदेखील आपले कर्तव्य बजावले तर नवी बेज परिसरातील गावठी दारूवाल्यांविरोधात ठोस कारवाई होईल. आणि या परिसरातील गावठी दारू तयार होणे बंद होईल असे मत ग्रामस्थांनी वयक्त केले आहे.
पोलिस कारवाई करताना दारू तयार करणाऱ्यांच्या लक्षात येऊ नये म्हणून गावठी दारूच्या अडडयांवर छापे टाकताना कळवणचे पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांनी शासकीय वाहनाऐवजी खासगी काळी पिवळी या वाहनातून प्रवास केला. पोलिसांच्या यूनिफॉर्मऐवजी साध्या वेशात गावठी दारू अड्ड्यांवर धाडी टाकून अड्डे उद्ध्वस्त केले. कळवणच्या हद्दीतून अवैध दारूविक्री हद्दपार करण्याचा आक्र मक पवित्रा त्यांनी हाती घेतला आहे. घाटगे यांच्यासह पोलीस कर्मचारी खासगी वाहनांचा वापर करून साध्या वेशात धाडी टाकत असल्याने दारू विक्रेत्यांची चांगलीच दमछाक झाली आहे. पोलिसांच्या ‘आॅपरेशन वॉश आउट’ मोहिमेमुळे कळवण तालुक्यातील गावठी दारु विक्र ेत्यांचे धाबे दणाणले आहे. तालुक्यातून गावठी दारू समूळ नष्ट करण्याचा पवित्रा पोलिसांनी घेतल्याने ग्रामीण भागातील महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.
राजकीय दृष्टिकोनातून संवेदनशील असलेल्या नवी बेज गावात रस्त्यावरील सुरु असलेली अवैध दारु विक्र ी गावपातळीवरील पुढारीसह ग्रामस्थ व आजूबाजूच्या रहिवाशांना खटकत होती.
याबाबत परिसरातील काही महिलांनी गंभीर स्वरूपाच्या तक्र ारी केल्या होत्या. यामुळे येथील पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली आहे. आता येथील दारू विक्रेते घरातून दारू विक्र ी करण्याऐवजी थेट ग्राहकांशी संपर्क साधून बाहेरच्या बाहेर व्यवसाय करीत आहेत. या भागातील दारूविके्रत्यांविरोधात कळवण पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. (वार्ताहर)