दारू अड्ड्यावर छापा; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:30 AM2017-08-24T00:30:38+5:302017-08-24T00:30:44+5:30

विशेष पोलीस पथकाने शहरातील बांबू बाजार परिसर व कुकाणे येथील ओवाडीनाला या दोन ठिकाणी छापे टाकून चार हजार ९५० रुपयांचे गावठी व हातभट्टीची दारू बनविण्याचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Raid on liquor shop; The crime against the four | दारू अड्ड्यावर छापा; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

दारू अड्ड्यावर छापा; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next

मालेगाव : विशेष पोलीस पथकाने शहरातील बांबू बाजार परिसर व कुकाणे येथील ओवाडीनाला या दोन ठिकाणी छापे टाकून चार हजार ९५० रुपयांचे गावठी व हातभट्टीची दारू बनविण्याचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास बांबू बाजार परिसरात सूर्यवंशी सोडा दुकानाजवळ छापा टाकून अवैधरीत्या देशी दारूचा अड्डा चालविणाºया योगेश बळीराम पाटील रा. कुंभारवाडा, मद्य सेवन करणारे रोहिदास उखा पवार रा. वजिरखेडा, शंकर नथुमल खत्री रा. संगमेश्वर यांच्या ताब्यातून एक हजार ६५० रुपयांचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली. शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष पोलीस पथकातील उपनिरीक्षक सिद्धार्थ पिंगळे, पोलीस नाईक दिनेश पवार, पोलीस कर्मचारी नंदकिशोर पाटील, गौतम बोराळे, समाधान कदम, गोविंद बिºहाडे, जितेंद्र चौधरी यांनी कारवाई केली. कुकाणे येथील ओवाडीनाला परिसरात विशेष पोलीस पथकाने टाकलेल्या छाप्यात अवैधरीत्या गावठी दारूची भट्टी चालविणाºया गोविंद पिरा माळी (२८) रा. आदिवासीनगर, कुकाणे याच्याविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या ताब्यातून तीन हजार ३०० रुपये किमतीचे दारू बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.

Web Title: Raid on liquor shop; The crime against the four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.