नाशिक जिल्ह्यात अफूच्या शेतीवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2022 12:21 AM2022-03-19T00:21:58+5:302022-03-19T00:21:58+5:30

नाशिक : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील फुलेनगर (माळवाडी) शिवारात शेतकऱ्याने अफूची शेती फुुलविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वावी ...

Raid on poppy fields in Nashik district | नाशिक जिल्ह्यात अफूच्या शेतीवर छापा

नाशिक जिल्ह्यात अफूच्या शेतीवर छापा

Next

नाशिक : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील फुलेनगर (माळवाडी) शिवारात शेतकऱ्याने अफूची शेती फुुलविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वावी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या शेतीवर छापा टाकून सर्व अफूची झाडे जप्त करीत कारवाई केली. यात २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल वावी पोलिसांनी ताब्यात घेऊन शेतकऱ्यास अटक केली आहे.

फुलेनगर (माळवाडी) येथे सुमारे एक गुंठा जमिनीत अफूची लागवड केली असल्याची गुप्त माहिती वावी पोलिसांना समजली. त्यावरून वावीचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील, अपर अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईसाठी पथकाची निर्मिती केली. गुरुवारी (दि.१७) सायंकाळी सहायक निरीक्षक सागर कोते, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवळी, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दशरथ चौधरी, सहायक उपनिरीक्षक रामनाथ तांदळकर, हवालदार योगेश शिंदे, नितीन जगताप, प्रकाश चव्हाण, गोविंद सूर्यवाड यांच्यासह पोलिसांच्या पथकाने फुलेनगर शिवारातील शेतीवर छापा टाकला. यावेळी संशयित शेतकरी विलास कृष्णाजी अत्रे (वय ६२) यांच्या शेत गट नंबर ४०५ मध्ये सुमारे एक गुंठा जागेत अफूचे पीक घेतल्याच्या त्यांच्या निदर्शनास आले.
नायब तहसीलदार सागर मुंदडा, मंडळ कृषी अधिकारी अशोक बागूल, तलाठी कैलास गायकवाड, सोपान गुुळवे यांच्या उपस्थितीत अफू शेत पिकाचा पंचनामा करण्यात आला. सुमारे दोन ते अडीच महिन्यांची शेतातील सर्व अफूची झाडे पोलिसांनी उपटून जप्त केली. सुमारे १३० किलो वजन असलेली ओली व सुकी अफूच्या झाडांची किंमत २ लाख ६० हजार रुपये इतकी आहे. अफूच्या शेतीभोवती तीनही बाजूने मका पीक घेण्यात आले होते.

Web Title: Raid on poppy fields in Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.