ठेंगोडा नदीपात्रात वाळूमाफियांवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 06:14 PM2019-07-09T18:14:04+5:302019-07-09T18:14:30+5:30

तहसीलदारांकडून कारवाई : चार ट्रॅक्टर जप्त, सव्वा पाच लाखांचा दंड

Raid on the sandmap in the Thangoda river bed | ठेंगोडा नदीपात्रात वाळूमाफियांवर छापे

ठेंगोडा नदीपात्रात वाळूमाफियांवर छापे

Next
ठळक मुद्देठेंगोडा नदीपात्रातून सटाणा शहरात ट्रॅक्टरने वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती

सटाणा : जिल्ह्यात अवैधरित्या वाळू उपसा करण्याचे सत्र सुरू असून मंगळवारी (दि.९) पहाटे बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी ठेंगोडा नदीपात्रात छापे टाकून वाळूची चोरटी वाहतूक करणारे चार ट्रक्टर पकडले आहेत. या जप्त केलेल्या ट्रॅक्टर वर सव्वा पाच रु पयांची दंडात्मक कारवाई केली असून या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे.
सटाणा शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असतांना याच बांधकामांवर चोरटी वाळू वापरली जात असल्याच्या तक्र ारी महसूल विभागाकडे केल्या जात होत्या. त्याची दखल घेत बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी सोमवारपासून (दि.८) धडक मोहीम हाती घेतली आहे. ठेंगोडा नदीपात्रातून सटाणा शहरात ट्रॅक्टरने वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तहसीलदार इंगळे पाटील यांनी मंगळवारी पहाटे नदीपात्रात सापळा रचून छापे टाकले. या छापामारीत पॉवर ट्रक कंपनीचे एक ट्रॅक्टर ,न्यूहॉलंड कंपनीचे एक व सोनालिका कंपनीचे दोन असे चार ट्रॅक्टर रंगेहात पकडण्यात आले. जप्त केलेल्या या ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून तब्बल सव्वा पाच लाख रु पयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Web Title: Raid on the sandmap in the Thangoda river bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक