ओझर येथे गावठी दारू अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 09:06 PM2020-04-29T21:06:49+5:302020-04-29T21:07:01+5:30
ओझर : अवैधरीत्या सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून दोन ठिकाणाहून २७५५ रु पये किमतीच्या गावठी दारूसह देशी दारू जप्त केली असून, दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ओझर : अवैधरीत्या सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून दोन ठिकाणाहून २७५५ रु पये किमतीच्या गावठी दारूसह देशी दारू जप्त केली असून, दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लॉकडाउनदरम्यान ओझर (कांजर घाट) सुकेणे, दीक्षी रोड श्रमिकनगर येथे गावठी दारू व सरकारवाडा येथे देशी दारू विक्रीचा अवैधरीत्या व्यवसाय सुरू असल्याची चर्चा रंगत होती. त्याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह कॉन्स्टेबल बाळासाहेब पानसरे, भास्कर पवार, नितीन कारंडे, शिंदे, माधुरी गायकवाड, दुर्गा खाने, मनीषा गायकवाड यांनी श्रमिकनगर भागात धडक कार्यवाही करत हजार रुपयांची हातभट्टीची गावठी दारू हस्तगत करून एका महिलेविरुद्ध कारवाई केली. तसेच सरकारवाडा भागात देशी दारू विक्री करणाऱ्या महिलेस रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून २७ मदिरा देशी दारूच्या १७५५ रुपये किमतीच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे एकूण २७५५ रुपयांची दारू हस्तगत करून दोन्ही महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
------
तळीरामांची आबळ झाल्याने मद्य बनवण्याचे घरगुती उपाय सुचवले जात आहेत. त्यात काळा खराब गूळ आणि नवसागर नामक वस्तूची होणारी अवैध विक्र ी हे खरे मूळ आहे. पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी केल्यास परिसरात आणखीन हटभट्ट्या उद्ध्वस्त होतील. त्यातून अनेक कुटुंबांचे होणारे नुकसान टळेल. मध्यंतरी दारूची अवैध होणारी विक्री चर्चेचा विषय बनू पाहत असताना पोलिसांनी केलेले कोम्बिंग आॅपरेशन कायमस्वरूपी राहो इतकीच माफक अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.