पिळकोस परिसरात हातभट्टी व्यवसायांवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 07:04 PM2018-12-07T19:04:45+5:302018-12-07T19:05:02+5:30
कळवण तालुक्यातील पिळकोस, गिरणा नदीकाठ व काटवन परिसरातील जंगल परिसरात शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत कळवण पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक एस.जी. मांडवकर यांनी आपल्या वीस ते पंचवीस सहकाऱ्यांसह हातभट्टीची दारू बनविणाºया ठिकाणांवर धाडी टाकल्या.
पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस, गिरणा नदीकाठ व काटवन परिसरातील जंगल परिसरात शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत कळवण पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक एस.जी. मांडवकर यांनी आपल्या वीस ते पंचवीस सहकाऱ्यांसह हातभट्टीची दारू बनविणाºया ठिकाणांवर धाडी टाकल्या.
गिरणा नदी काठालगतच्या काटेरी जंगलातील हातभट्टीची गावठी दारू बनविणाºया हातभट्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या. दारू बनविण्यासाठी वापरात येणारे रसायनांसह इतर साहित्य नष्ट केले आहे तर चार ते पाच ठिकाणी हातभट्टीची दारू बनवणे सुरू होते. पोलीस दिसता सर्व मुद्देमाल सोडून हे व्यावसायिक काटवन परिसरात पसार झाले. कारवाई नंतर हातभट्टीची गावठी दारू व त्यासाठी तयार असलेले रसायनाचे नमुने घेण्यात आल्याची माहिती कळवणचे पोलीस निरीक्षक एस. जी. मांडवकर यांनी पिळकोस येथे लोकमतला दिली.
कळवण तालुक्यातील पूर्वभागात हातभट्टीची दारू बनवून गावात भरदिवसा राजरोेस विक्री होत असलेल्या तक्रारी व या भागातून मोठ्या प्रमाणात आल्या होत्या तसेच हातभट्टीची दारू बाहेरच्या व्यावसायिकांना पुरवणारे रॅकेट या परिसरात असल्याने तेही पूर्णपणे उद्ध्वस्त करून ग्रामीण भागातील हातभट्टीची दारू बनवणाºया व्यावसायिकांना पोलिसी खाक्या दाखवत साहित्य हस्तगत करण्यात आले असल्याने अवैध व्यवसाय करणाºयांचे धाबे दणाणले आहेत.
कळवण तालुक्यातील पिळकोससह परिसरात मोठ्या प्रमाणात हातभट्ट्या व हातभट्टीच्या दारूसाठी तयार असलेले रसायन नष्ट करण्याची ही तीस वर्षातील पहिलीच वेळ होती. यात मोठ्या प्रमाणावर रसायन नष्ट करण्यात आले असून, तालुक्यातील या पूर्वभागात आतापर्यंतची सर्वात मोठी पहिलीच मोहीम पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाली असल्याने अवैध हातभट्टीची दारू बनून विक्र ी करणाºयांचे धाबे दणाणले आहेत.