जायखेडा कार्यक्षेत्रातील गावठी दारूच्या हातभट्टयांवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 03:50 PM2018-09-17T15:50:32+5:302018-09-17T15:50:50+5:30
७ जणांना अटक : जायखेडा पोलिसांची धडक कारवाई
जायखेडा : गणेशोत्सवाच्या पाशवभूमीवर जायखेडा पोलिसांनी धडक कारवाई करीत आपल्या कार्यक्षेत्रातील ठिकठिकाणच्या गावठी दारू निर्मिती व केंद्रावर छापे टाकून हातभट्टया उद्धवस्त केल्या. या कारवाईत शेकडो लिटर रसायन नष्ट करण्यात आले. जायखेडा पोलिसांनी सोमवारी (दि.१७)पहाटे ही मोठी कारवाई केली. या कारवाईत जवळपास २९ हजार २५० रु पयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गणेशोत्सव काळात तळीरामांवर अंकुश ठेवण्यासाठी व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जायखेडा पोलीस ठाण्याचे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव व पोलीस हवालदार शिवाजी गुंजाळ, राजेंद्र सावळे, पोलीस नाईक निकश कोळी, निंबा खैरनार, देविदास माळी व पोलीस कर्मच्याऱ्यांच्या पथकाने श्रीपुरवडे, वाघळे, आखतवाडे, वडे खुर्द या गावातील विविध ठिकाणी हि धडक कारवाई केली. या कारवाईत ५०० ते ७०० लिटर हून अधिक गावठी दारू व रसायन नष्ट करण्यात आले असून, जवळपास २९ हजार २५० रु पयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात येऊन, गुन्हा दाखल करण्यात आला आहे
कचराकुंड्या म्हणून बॅरेल मोफत
या आधीही कार्यक्षेत्रातील अनेक हातभट्टया उद्धवस्त करण्यात आल्या आहेत. गावठी दारू विक्र ी व निर्मिती रोखण्यासाठी पोलीस कटिबद्ध असून, जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर आगामी काळातही अशाच स्वरु पात कडक कारवाई सुरु राहणार आहे. ग् जप्त करण्यात आलेले बॅरेल फोडून नष्ट न करता स्वच्छ भारत अभियानाला हातभार म्हणून हे बॅरेल कचराकुंड्या म्हणून वापरण्यासाठी नागरिकांना मोफत वाटण्याचा अभिनव उपक्र म जायखेडा पोलिसांकडून राबविला जाणार आहे.
- गणेश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक