जायखेडा पोलीसांकडुन गावठी दारु अड्यांवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 07:49 PM2018-08-10T19:49:38+5:302018-08-10T19:50:01+5:30
गटारी अमावस्येच्या पूर्वसंध्येला जायखेडा पोलिसांनी दारूबंदी मोहिमेच्या पहील्या टप्प्यात ठिकठिकाणी छापे टाकून गावठी दारूच्या भट्ट्या उध्वस्त केल्या. रसायन नष्ट करून जप्त करण्यात आलेले बॅरेल फोडून नष्ट न करता स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी बॅरेल कचराकुंड्या म्हणून वापरण्यासाठी नागरीकांना मोफत वाटण्याचा अभिनव उपक्र म जायखेडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
सटाणा : गटारी अमावस्येच्या पूर्वसंध्येला जायखेडा पोलिसांनी दारूबंदी मोहिमेच्या पहील्या टप्प्यात ठिकठिकाणी छापे टाकून गावठी दारूच्या भट्ट्या उध्वस्त केल्या. रसायन नष्ट करून जप्त करण्यात आलेले बॅरेल फोडून नष्ट न करता स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी बॅरेल कचराकुंड्या म्हणून वापरण्यासाठी नागरीकांना मोफत वाटण्याचा अभिनव उपक्र म जायखेडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. गटारी अमावस्येच्या पूर्वसंध्येला तळीरामांना धडा शिकविण्यासाठी तसेच अवैध गावठी दारू निर्मिती व विक्र ी अड्यांवर जायखेडा पोलिसांनी शुक्र वारी (दि.१०) पहाटेपासून धडक कारवाई करत छापेमारी केली .सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी ठिकठिकाणी दारू भट्टी अड्यांवर तसेच विक्र ी केंद्रावर छापा टाकून रसायन आणि दारूचे बॅरेल जप्त करून नष्ट केले आहेत. दसवेल,तेलदरा,वाघंबा,आसखेडा व तांदूळवाडी येथे ही छापेमारी करण्यात आली . याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी दिली. सुमारे पाचशे लिटरहून अधिक गावठी दारू व रसायन नष्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पाउन लाखहून अधिक रु पयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला आहे. या गुन्ह्यांमध्ये अशोक माळी (रा.दसवेल),जिजाबाई सोनवणे (रा.तेलदरा),वाधु सूर्यवंशी (रा.वाघंबा),तुळशीराम महाले(रा.वाघंबा) या चौघांना अटक केली असून उर्वरीत फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम कोळी, पोलीस हवालदार अंबादास थैल, देविदास माळी, राजू गायकवाड, दशरथ गायकवाड, निंबा खैरनार, राजेंद्र सावळे यांच्या पथकाने हीकामिगरी केली आहे. आगामी काळातही अवैध धंद्यावर अशाच स्वरु पात कडक कारवाई सुरु राहणार आहे.