रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:57 AM2017-09-03T00:57:06+5:302017-09-03T00:57:21+5:30
कसारा जवळील आसनगाव येथे पाच दिवसांपूर्वी दुरांतो एक्स्प्रेसला झालेल्या अपघातानंतर शनिवारी सकाळी रेल्वेचे दोन्ही मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई-मनमाड दरम्यानची रेल्वे वाहतूक हळूहळू रुळावर आली आहे. राज्यराणीसह लांब पल्ल्याच्या नाशिकरोड मार्गे धावणाºया शनिवारच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. रविवारी वाहतूक पूर्णपणे सुरळीत होईल, असे रेल्वे सूत्रांनी सांगितले.
नाशिकरोड : कसारा जवळील आसनगाव येथे पाच दिवसांपूर्वी दुरांतो एक्स्प्रेसला झालेल्या अपघातानंतर शनिवारी सकाळी रेल्वेचे दोन्ही मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई-मनमाड दरम्यानची रेल्वे वाहतूक हळूहळू रुळावर आली आहे. राज्यराणीसह लांब पल्ल्याच्या नाशिकरोड मार्गे धावणाºया शनिवारच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. रविवारी वाहतूक पूर्णपणे सुरळीत होईल, असे रेल्वे सूत्रांनी सांगितले.
आसनगाव जवळ अपघात स्थळांचे तात्पुरते काम पूर्ण झाल्याने शनिवारी सकाळी मुंबईकडे जाणारा रेल्वेमार्ग (डाऊन) सकाळी सुरू करण्यात आला. तेथून रख्सोल-एलटीटी कर्मभूमी एक्स्प्रेस सकाळी ८.४५ वाजता रवाना झाली. त्यानंतर मुंबईहून सुटणाºया व जाणाºया रेल्वे गाड्या थोड्या उशिराने मार्गक्रमण करीत होत्या. मध्य रेल्वेची मुंबई-मनमाड दरम्यानची विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक व उशिरा धावणाºया रेल्वे निर्धारित वेळेत जाण्यासाठी शनिवारी मनमाड-मुंबई राज्यराणी रेल्वे रद्द करण्यात आली होती. तसेच लांब पल्ल्याच्या शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शनिवारी दिवसभर मुंबईला पोहोचणाºया लखनौ-मुंबई पुष्पक, सिकंदराबाद-मुंबई देवगिरी, पंजाब मेल, विदर्भ, जनता एक्स्प्रेस, हावडा मेल, गरीबरथ, वाराणसी, महानगरी, पटना सुपर, गोरखपूर-पनवेल, कामाख्या या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर मुंबईहून सुटणाºया तपोवन, गोहाटी, पवन, गरीबरथ, मुंबई-अमरावती, जनता एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस मनमाड-दौंड-पुणे मार्गे रवाना करण्यात आली. काशी १ तास उशिरा तर उद्योगनगरी ३७ तास, पुष्पक- २४ तास, लखनौ-एलटीटी- २२ तास उशिराने धावत होत्या. दुरांतोच्या अपघातामुळे अवेळी झालेले रेल्वेचे वेळापत्रक निर्धारित वेळेत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे शनिवारच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.