चौंधाणे गावाजवळील पुलाचे रेलिंग तुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 03:31 PM2020-08-03T15:31:24+5:302020-08-03T15:32:45+5:30
सटाणा : चाळीसगाव - काठरे या राज्य मार्गावरील सटाणा-डांगसौंदाणे रस्त्यावरील चौंधाणे गावानजीकच्या पुलाचे रेलिंग कोसळल्याने हा पुल वाहतुकीसाठी धोकेदायक बनला आहे.
सटाणा : चाळीसगाव - काठरे या राज्य मार्गावरील सटाणा-डांगसौंदाणे रस्त्यावरील चौंधाणे गावानजीकच्या पुलाचे रेलिंग कोसळल्याने हा पुल वाहतुकीसाठी धोकेदायक बनला आहे.
सटाणा-डांगसौंदाणे रस्त्यावरील चौधाणे गावानजीक असलेल्या पुलाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. कळवण तालुका व गुजरातला जोडणारा जवळचा मार्ग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. यंदा पहिल्याच पावसाळ्यात या पुलाची रेलिंग तुटल्याने हा पुल वाहतुकीसाठी अतिशय धोकेदायक बनला आहे.
या पुलाची उंची तसेच रु ंदी वाढविणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यास हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होऊन जनजीवन विस्कळीत होते.
दरम्यान या धोकादायक पुलाची आमदार दिलीप बोरसे यांच्यासह ग्रामस्थांनी पाहणी केली. यावेळी संबधित कळवण सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शेखर पाटील यांना पाचारण करून वर्दळीच्या रस्त्यावरचा पुल असल्यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडू नये म्हणून तत्काळ नवीन पुल प्रस्तावित करण्याच्या सूचना दिल्या असुन वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने पुलाची दुरु स्ती तातडीने करण्याच्या सुचना देण्यात आल्या. (फोटो ०३ सटाणा)