गँगमनच्या सतर्कतेमुळे टळला रेल्वेचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 01:38 AM2018-12-16T01:38:12+5:302018-12-16T01:38:42+5:30

थंडीची पर्वा न करता गस्त घालणाऱ्या गॅँगमनमुळे मध्य रेल्वेमार्गावरील संभाव्य अपघात टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Railway Accident | गँगमनच्या सतर्कतेमुळे टळला रेल्वेचा अपघात

गँगमनच्या सतर्कतेमुळे टळला रेल्वेचा अपघात

Next

नाशिकरोड : थंडीची पर्वा न करता गस्त घालणाऱ्या गॅँगमनमुळे मध्य रेल्वेमार्गावरील संभाव्य अपघात टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, ट्रॅकमेंटनेर गणेश बोडके आणि निवृत्ती लोहकरे यांना घोटी-पाडळी स्टेशनच्या खांब नंबर १५२/२३ ते १५२/२५ या दरम्यान रुळाला तडे गेलेले आढळले. तर ट्रॅकमेन्टेर भगवान मेंगाळ आणि संतोष मोसे यांना इगतपुरी-घोटी सेक्शन कि.मी. खांब नंबर १४३/३१, १४४/१ या दरम्यान रु ळाला तडे गेलेले आढळले. त्यांनी वेळीच सदर प्रकार वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिला. गॅँगमन कडाक्याच्या थंडीतही रुळावर गस्त घालत असतात.
इगतपुरी-घोटीदरम्यान रात्री दीडच्या सुमारास या गॅँगमनना रुळाला तडा गेलेला आढळला. या मार्गावरून मुंबई-एलटीटी राजेंद्रनगर एक्स्प्रेस जाणार होती. दुसºया ट्रॅकवरून मालगाडी घोटीकडे येत होती. त्या मार्गावरही रुळाला तडा गेल्याचे आढळले. या गाड्या तशाच पुढे गेल्या असत्या तर डबे रूळावर घसरून मोठी जीवित व वित्तहानी झाली असती. मध्य रेल्वेच्या इगतपुरी-घोटी मार्गादरम्यान मुंबई एलटीटी-राजेंद्रनगर जनता एक्स्प्रेसचा मोठा अपघात गॅँगमनच्या सतर्कतेमुळे टळला.
सूत्रांनी सांगितले की, अप मार्गावर कसाºयाकडे जाताना घोटी-पाडळी भागात रुळाला पाच मिलीमीटर रूंदीचे तडे गेले होते, तर डाउन मार्गावर इगतपुरीकडे येताना घोटी-इगतपुरीदरम्यान रुळाला तडे गेले होते. गस्त घालताना गॅँगमनच्या दोन स्वतंत्र पथकांनी हे हेरले. त्यांनी कार्यालयाला कळविल्यावर उपाययोजना करण्यात आली. उपाययोजना केल्यावर जनता एक्स्प्रेस ही गाडी कमी वेगात पुढे गेली. भुसावळहून मुंबईकडे रात्री दीडच्या सुमारास मालगाडी जाणार होती. गस्त घालताना रुळाला तडे गेल्याचे लक्षात आल्यावर तात्पुरती उपाययोजना करण्यात आली. सकाळी दुरुस्ती करण्यात आली.

Web Title: Railway Accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.