सब-वे बाबत रेल्वे प्रशासनाचे घूमजाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 11:03 PM2021-10-11T23:03:41+5:302021-10-11T23:04:42+5:30
नांदगाव : रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करून अपघात घडणार नाही याची काळजी घेण्याचे, रेल्वे स्थानक नजीक रेल्वे येत असताना गती कमी ठेवण्यासंदर्भात सूचना देण्याचे व रेल्वे येत असल्यास तसा अलार्म लावून नागरिकांना सावध करण्याचे लेखी आश्वासन देणाऱ्या रेल्वे प्रशासनाने घूमजाव करीत सब-वे शेजारी भिंत बांधण्याची सुरुवात केल्याने लक्ष्मी थिएटर्स जवळील नागरिकांचा संपर्क पुन्हा खंडित झाला आहे.

रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाच्या या मनमानी कारभारामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या सोबत मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी, भुसावळ विभागाचे मंडळ महाप्रबंधक एस.एस केडिया यांनी घेतलेल्या वेबेक्स बैठकीला सब-वेतील असलेल्या दोषांची दुरुस्ती करण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यानंतर सब-वेत साचलेल्या पाण्यामुळे जाण्या-येण्यासाठी रस्ता नसल्याने रेल्वे क्रॉसिंग करण्याच्या प्रयत्नात रविवारी एका भाविक महिलेचा मृत्यू झाला. संतप्त नागरिकांनी स्थानक प्रबंधकांच्या कार्यालयात जाब विचारला तेव्हा लेखी आश्वासन देण्यात आले होते.
सोमवारी (दि.११)त्याप्रमाणे आरपीएफ नियुक्त देखील करण्यात आले. मात्र दुपार नंतर लक्ष्मी थिएटर्स कडील वापरात नागरिकांचा मार्ग लोखंडी जाळी लावून अचानक बंद करण्यात आला. शिवाय सबवे लगत लेंडी नदी शेजारील रस्त्यावर भिंत उभारण्याच्या कामाला सुरुवात झाल्याने संतप्त नागरिकांच्या दुखण्यावर मीठ चोळले गेले.
आले अधिकाऱ्यांच्या मना...!
एकीकडे सब-वेत असलेल्या तांत्रिक आराखड्यातील दोष दूर करण्याची ग्वाही द्यायची अन् दुसरीकडे दिलेल्या आश्वासनाचा शब्द पाळण्याऐवजी चक्क वेठीला धरायचे अशा लहरी कारभाराला नागरिकांना सामोरे जाण्याचा प्रसंग उदभवला आहे. केंद्रात थेट मंत्रिमंडळात असणाऱ्या राज्यमंत्र्यालाच रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याऐवजी रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाने दिलेल्या सूचना झुगारत मनमानी सुरु केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. त्यामुळे ह्यआले रेल्वे अधिकाऱ्यांच्या मना, तेथे कुणाचे चालेनाह्ण असा विचित्र अनुभवाला नागरिकांना सामोरे जाण्याचा प्रसंग उदभवला आहे.